‘चला हवा येऊ द्या’मध्ये स्वप्निल जोशी ५०० वर्षा नंतर पुन्हा प्रकट होणार

 

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात आता स्वप्निल जोशी याच्या प्रवेश होणार असून तो या कार्यक्रमात कलाकारांचा मार्गदर्शक बनणार आहे.

थुकरटवाडीतील कलाकार एका भव्य वास्तूमध्ये वास्तव्याला आहेत. ही जागा आहे एका जुन्या राजाची, महाराजा प्रदीप सिंग ऊर्फ बच्चू जोशी यांची. ते ५०० वर्षांपूर्वीच निवर्तले आहेत, पण त्यांच्या या पवित्र आणि प्रिय वास्तूशी थुकरटवाडीचे लोक छेडछाड करतात आणि त्या रागातून राजाचा आत्मा तेथे अवतीर्ण होतो. या सर्व थुकरटवाडीकरांना बंदी बनवतो आणि राजाला हसवण्याची, त्याचे मनोरंजन करण्याची शिक्षा देतो… आणि मग खळाळत्या मनोरंजनाला, धमाल माहोल निर्माण व्हायला सुरुवात होते. अर्थातच हा माहोल ‘चला हवा येऊ द्या’च्या प्रेक्षकांना या दिवाळीत अनुभवता येणार आहे.

‘चला हवा येऊ द्या’च्या निर्मात्यांनी एक वेगळा प्रयोग यावेळी दिवाळीत केला आहे. यातील कलाकार ७ दिवस एका भव्य फार्महाऊसवर राहणार आहेत. तेथे ते धमाल करणार आहेत. आणि तिच या दिवाळीत रसिकांसमोर येणार आहे.

हसविण्याच्या या नवीन संकल्पामध्ये स्वप्निल जोशी अर्थातच राजाच्या भूमिकेत असणार आहे. समोरच्या सिंहासनावर बसून तो या मनोरंजनाचा आनंद घेणार आहे आणि त्यात सहभागीही होणार आहे.

“चला हवा येऊ द्या’चा मंच माझ्यासाठी नवीन नाही. मी येथे अनेकदा आलो तर आहेच पण त्याचबरोबर यातील कलाकारांशी माझा परिचय फार जुना आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे हे सर्व ‘फू बाई फू’ कार्यक्रमातून पुढे आले आहेत, तर निलेश साबळे त्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक होता. त्यांचाप्रवास मी तेव्हापासून अनुभवतोय. त्या सर्वांचा मी चाहता आहे. या नवीन प्रयोगाच्या माध्यमातून मी त्यांचा मितवा म्हणून कार्यक्रमात सहभागी होतो आहे. त्यामुळे आता मला या आवडत्या कार्यक्रमात सातत्याने सहभागी होता येईल, समोर बसून त्यांचा आविष्कार पाहता येईल, कलाकारांना दाद देता येईल. या कलाकारांना कोपरखळी मारता येईल, त्यांची गम्मत करता येईल, त्यांच्याकडूनही करून घेता येईल. त्याद्वारे या कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांनाही कम्फर्टेबल करता येईल,” असे स्वप्निल म्हणाला.

 


 

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns