सचिन चिटणीस….
या चित्रपटाला मिळत आहेत⭐⭐⭐
किती गरीब मुलांना शिकून सुद्धा नोकरी मिळण्याचे वांदे असतात आता आपण एवढं शिक्षण घेतलेला आहे आपल्याला चांगली नोकरी मिळेल या अपेक्षेने ते इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात करतात मात्र कुठेही चांगली नोकरी मिळणे त्यांच्या नशिबात नसते अशा वेळेस एकूणच आपल्या कुटुंबाचा आई-वडिलांचा घरच्या मंडळींचा विचार करून यातील काही मुलं ही वाम मार्गाने पैसे मिळवायचा प्रयत्न करतात आणि ते यात फसतच जातात……..
असंच काहीसं “होय महाराजा” या शैलेश शेट्टी दिग्दर्शित चित्रपटात चित्रपटाचा नायक रमेश ( प्रथमेश परब ) आपलं शिक्षण झालं आहे तर आपल्याला चांगली नोकरी मिळेल या उद्देशाने मुंबईत येतो व आपल्या मामा ( अभिजीत चव्हाण ) कडे राहतो रोज कुठे ना कुठेतरी इंटरव्यू देत चांगल्या नोकरीच्या शोधात असतो मात्र त्याला नोकरी मिळते ती पिऊनची मात्र या कंपनीतील मॅनेजर ( समीर चौगुले ) बरोबर रमेश चे भांडण होऊन मॅनेजर त्यास कंपनीच्या बाहेर काढतो.
त्यानंतर रमेश आपल्या मामासोबत घराघरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे काम करत असतो व तिथूनच त्याला वामा मार्गाने पैसे कमवायची आयडिया सुचते. मोठ्या लोकांच्या घरात पेंटिंग तसेच महागड्या महागड्या मुर्त्या ठेवण्याची आवड असते. तो सीसीटीव्ही कॅमेरा लावता लावता या ओरिजनल मुर्त्या चोरून त्या जागी खोट्या मुर्त्या व पेंटिंग ठेवत असे व ओरिजनल मुर्त्या विकत असते. हे करत असताना त्याला रशीद भाई ( संदीप पाठक ) नामक गुंड मिळतो तोही त्याच्यासोबत हा धंदा करू लागतो मात्र एके दिवशी चुकून रशीद भाईचा बॉस अण्णाच्या ( वैभव मांगले ) घरी रमेश व त्याचा मामा अँटिक पीस म्हणून ठेवलेले पांच मोठी अंडी चोरतात. अण्णाला हे जेव्हा कळते तेव्हा तो या तिघांच्या प्रेमिकांना उचलून त्याच्या अड्ड्यावर आणतो तो रमेशला ताकीत देतो त्याचे त्याच्या घरातून चोरलेले सामान परत आणून दे व या तिघींना घेऊन जा.
रमेश अण्णाच्या घरातून चोरलेली अंडी अण्णाला परत देतो का ? अण्णा या तिघांच्या प्रेमिकांना सोडतो का ? हे मोठ्या पडद्यावर बघण्यात अधिक धमाल आहे.
प्रथमेश परबने रमेशच्या कॅरेक्टरला नेहमीप्रमाणे न्याय दिला आहे.
संदीप पाठक ने रशीद भाई चे कॅरेक्टर चांगले निभावले आहे.
वैभव मांगले, अभिजीत चव्हाण, व समीर चौगुले ठीक ठाक.
एकूणच डोके बाजूला ठेवून हा चित्रपट एन्जॉय करायला काहीही हरकत नाही.
दिग्दर्शित
शैलेश शेट्टी
यांनी लिहिलेले
संचित बेद्रे
द्वारे उत्पादित
एलएमएस फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड
तारांकित
प्रथमेश परब (रम्याच्या भूमिकेत), संदीप पाठक (रशीद भाईच्या भूमिकेत), अभिजित चव्हाण (अनमोल गोटे/मामाच्या भूमिकेत), समीर चौघुले (जिग्नेसच्या भूमिकेत), वैभव मांगले (अण्णा म्हणून), अंकिता लांडे (आयशा म्हणून), सानिका काशीकर (म्हणून). सानिया) नेहा वाजे परांजपे (मामीच्या भूमिकेत), संदीप रेडकर (शशिकांत जाधव म्हणून), संदीप जुवटकर (उदयच्या भूमिकेत), अमीर तडवळकर (अब्बास भाईच्या भूमिकेत), श्रद्धा जोशी (इन्स्पेक्टर शहाणे)
सिनेमॅटोग्राफी
वासुदेव राणे
द्वारा संपादित
निलेश नवनाथ गावंड
द्वारे संगीत
चिनार – महेश
उत्पादन कंपनी
एलएमएस फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड
द्वारे वितरीत केले
सिनेपोलिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड