‘झोल झाल’ फुल टू धमाल

‘झोल झाल’ फुल टू धमाल

काही चित्रपट असे असतात की ते कोणतंही लॉजिक न लावता बघावयाचे असतात तरच आपण त्याची गम्मत घेऊ शकतो त्या पठडीतील चित्रपट म्हणजे लेखक दिग्दर्शक मानस कुमार दास, निर्माता संजना अगरवाल, विनय अगरवाल, गोपाळ अगरवाल, रश्मी अगरवाल यांचा ‘झोल झाल’ होय.

हा चित्रपट बघताना, हे असं का? ते तसं का? असे प्रश्न न विचारता समोर चित्रपट चालू असून आपण फक्त त्यातील आनंद घ्यायचा या उद्देशाने हा चित्रपट बघितल्यास आपले चांगलेच मनोरंजन होईल.

एका गावात एनआरआय असलेल्या बळवंत पाटील ( मनोज जोशी ) यांचा ६०० कोटी रुपये किंमतीच्या महाल असतो तो त्यांच्या कडे पूर्वा पार चालत आलेला असतो म्हणून तो त्यांना प्रचंड प्रिय असतो. या महालात बळवंतराव वर्षातून एकदा येत असतात इतर वेळी या महालात त्यांची कुत्री आणि एक नोकर कांशीराम ( भारत गणेशपुरे ) रहात असतो.
या महालावर बिल्डर दीक्षित ( मंगेश देसाई), कुख्यात डॉन ददाऊद ( कुशल बद्रिके ), मंत्री रावसाहेब ( उदय टिकेकर ) यांचा डोळा असतो. काहीही करून हा महाल आपल्यालाच मिळावा यासाठी हे तिघे वाट्टेल ते करण्यास तयार असतात पण बळवंत यांचा महाल विकावयास ठाम नकार असतो.

एक दिवस अचानक बळवंत भारतात आपल्या महालात येतात सोबत त्यांचे दोन पुत्र जय व विरु देखील असतात आणि ते महाल विकण्याचा निर्णय घेतात. यापुढे चित्रपटात नुसता राडा होतो. बळवंत आपला वाडा विकतात का? तिघां पैकी कोणाला वाडा विकतात? बळवंत वाडा विकावयाचा निर्णय का घेतात? ही सगळी ‘झोल झाल’ चित्रपट गृहात जाऊन बघावयास मजा आहे.

थोडक्यात काय डोके बाजूला ठेवा आणि ‘झोल झाल’ एंजॉय करा!

कलाकार : अमोल कागणे, प्रीतम कागणे, ईशा
अगरवाल, रितुराज फडके, अजिंक्य देव, मनोज
जोशी, मंगेश देसाई, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके
सुप्रिया कर्णिक, उदय नेने, उदय टिकेकर
लेखक दिग्दर्शक : मानस कुमार दास
निर्माता : संजना अगरवाल, विनय अगरवाल,
गोपाळ अगरवाल, रश्मी अगरवाल
एव्हीके एंटरटेनमेंट व अमोल कागणे फिल्मस्

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns