‘सूर लागू दे’  मात्र…..

‘सूर लागू दे’  मात्र…..

दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा हा शेवटचा चित्रपट असून, गोखले यांनी या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखेला उचित न्याय दिला असल्याचे हा चित्रपट बघताना जाणवते मात्र त्यांच्या आजारपणात हा चित्रपट शूट झाल्याचे प्रकर्षाने निदर्शनात येते त्यांच्या चेहऱ्यावरील थकलेपणा जाणवतो तरी विक्रम गोखले यांनी आपली संवाद फेक कुठेही कमी पडणार नाही याची काळजी घेतली आहे.

सर्वसामान्यांप्रमाणे चाळीत राहणाऱ्या मोहन दामले ( विक्रम गोखले ) आणि त्यांची पत्नी राधा ( सुहासिनी मुळ्ये ) यांनी आपल्या कॅन्सर झालेल्या नातवाला जगवण्यासाठी केलेला संघर्ष या चित्रपटात आहे. मुलगा आणि सून जिवंत नसल्याने त्यांच्या पश्चात दोन नातवंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी दामलेंवर येते.

निवृत्त झाल्यानंतरही उदरनिर्वाह साठी नोकरी करून आपल्या कुटुंबाचा खर्च कसाबसा चालवणारे दामलेंना त्यांच्या नातवाला ब्लड कॅन्सर झाल्याचे समजते त्यानंतर त्याच्या उपचारासाठी दामलेंनी केलेला संघर्ष,  त्यांच्या चाळीतील शेजाऱ्यांनी दिलेली त्यांना साथ म्हणजेच ‘सूर लागू दे’ हा चित्रपट आहे.

चित्रपट थोडा संथ झाला असून तो थोडा अधिक गतिमान झाला असता तर अधिक परिणाम साधला गेला असता. माणुसकी पेक्षा आपल्या चॅनलचे रेटिंग कसे वाढेल याचाच विचार करणाऱ्या पत्रकारांवर आसूड ओढण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केला असला तरी ते खूपच बालिश वाटते.

रीना मधुकरने अभिनय चांगला केला आहे. मेघना नायडूनेही आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. याखेरीज आशिष नेवाळकर, जयराज नायर, सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुके यांनी सहायक भूमिकांमध्ये चांगली साथ दिली आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns