‘ मजबूत.. जुन फर्निचर ‘
सचिन चिटणीस….. 4.5 ⭐
महेश……महेश……..आणि महेशच
महेशच का. कारण त्यांनी जे काही चित्रपटात केले आहे त्याला तोड नाही. कोर्ट ड्रामा चालू असतांना त्याचा अभिनय, त्याचे तुटक तुटक बोलणं, ठामपणे उत्तर देणे हे सगळे बघून मला एक क्षण असं वाटले जज च्या खुर्चीत बसलेला सचिन खेडेकर पण अवाक झाला असेल.
तर मी चित्रपटाची तुम्हाला सगळी स्टोरी सांगणार नाही कारण चित्रपट बघण्यात खूप मजा आहे.
आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना आजकालची मुलं भेटत नाहीत बोलत नाहीत. काय अपेक्षा असतात त्या आई-वडिलांच्या मुलांकडून दिवसातून एकदा नुसतं विचारलं आई कशी आहेस? बाबा कसे आहात? तरी त्या आई-वडिलांना समाधान वाटते त्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती आनंदाची रेषा उमटते. आपल्याकडे अनेकदा आपल्या वयस्कर आई-वडिलांना अडगळीतले सामान असे म्हटले जाते. परंतु याच जुन्या फर्निचरची किंमत आणि ताकद काय आहे, हे आपल्या जुन्या फर्निचरची किंमत पटवून देणारा दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा ‘जुन फर्निचर’ हा चित्रपट आपल्याला रडवतो.
जुनं फर्निचर… या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !” हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करतो. नकळत आपल्याला त्या पात्रांच्यात गुंतवून ठेवतो. मुलांप्रती असलेल्या कर्तव्यांमध्ये आपण कमी पडलो तर याची चिंता आईवडिलांना नेहमीच असते. परंतु तीच चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का? वृद्धापकाळात मुलांकडून चार प्रेमाचे शब्द ऐकण्याची इच्छा प्रत्येक आई-वडिलांच्या मनात असते. ती इच्छाही ही पिढी पूर्ण करू शकत नसेल, तर आई वडिलांनी या वयात कोणाकडून प्रेमाची अपेक्षा ठेवावी, असा प्रश्न चित्रपट पाहून मनात उद्भवतो. आपल्या पोटच्या मुलावरच आईच्या मृत्यूचा आरोप गोविंद पाठक ( महेश मांजरेकर ) हे लावतात या प्रकरणाचा निकाल काय लागणार, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.
महेश ने केलेला तुफान अभिनय आपल्या काळजात घर करतो. त्याला मिळालेली मेधा मांजरेकरांची उत्तम साथ. भूषण प्रधानचा सहज अभिनय, उपेंद्र चा लव्हेबल गुंड छोट्या रोल मध्ये सुध्दा भाव खावून जातो.
सत्य- सई फिल्म्स आणि स्कायलिंक एन्टरटेनमेंट प्रस्तुत ‘जुनं फर्निचर’ चे यतिन जाधव निर्माते आहेत. ‘जुनं फर्निचर’ची कथा, पटकथा, संवाद, महेश वामन मांजरेकर यांनी लिहिले असून यात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हा चित्रपट प्रत्येकाने आपल्या मुलांसोबत नक्की पाहावा, त्यातून कदाचित मुलांचा दृष्टीकोन बदलेल.