रंगकर्मी नाटक समूह पॅनेलचा जबरदस्त विजय, प्रशांत दामले नूतन अध्यक्ष

रंगकर्मी नाटक समूह पॅनेलचा जबरदस्त विजय, प्रशांत दामले नूतन अध्यक्ष

अध्यक्षपदासाठी प्रशांत दामले यांना ५० मते तर नवनाथ कांबळी यांना ९ मते मिळाली असून प्रशांत दामले यांची अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुढील पाच वर्षा साठी अध्यक्ष म्हणून निवड झाली.

*प्रशांत दामले नाट्य परिषदेचे नूतन अध्यक्ष*

*निकाल खालीलप्रमाणे*

अध्यक्ष: प्रशांत दामले

उपाध्यक्ष (प्रशासन): नरेश गडेकर
उपाध्यक्ष (उपक्रम): भाऊसाहेब भोईर

प्रमुख कार्यवाह: अजित भुरे

कोषाध्यक्ष: सतीश लोटके

सहकार्यवाह:
समीर इंदुलकर
दिलीप कोरके
सुनील ढगे

कार्यकारिणी सदस्य
विजय चौगुले
देसाई चंद्रकांत
संदीप पाटील
गिरीश महाजन
सविता मालपेकर
संजय रहाटे
दीपक रेगे
सुशांत शेलार
विशाल शिंगाडे
विजय साळुंखे
दीपा क्षीरसागर
६० नियामक मंडळ सदस्यांनी आज मुंबई येथे मतदान केले. त्यातील १ मत बाद झाले.

या प्रसंगी मुंबई न्यूज २४x७ शी बोलतांना प्रशांत दामले म्हणाले नाट्यगृहात सोलर सिस्टीम लावावयाचा विचार असून यामुळे ए सी तसेच विजेचा वापर कमी होऊन नाट्यगृह कमी भाड्याने देणे परवडेल तसेच रंगकर्मी मुंबईत येतात तेव्हा त्यांचा राहण्याचा प्रश्न असतो हॉटेलचे भाडे त्यांना परवडत नाही तर अश्यांना राहण्यासाठी ५० टक्के सवलत मिळू शकेल का हे पाहावे लागेल.

नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा येत्या ४ ते ५ महिन्यात व्यवस्थित चालू कसे होतील हा माझा प्रयत्न असेल.

तसेच यशवंत नाट्यगृहाचे काय करणार कारण नाट्यगृह पडून ते नवीन बांधण्याचा विचार होता, यावर प्रशांत दामले म्हणाले, पाहिले नाट्यगृहाची सर्व कागदपत्र तपासावी लागतील, नक्की त्यात काय म्हटले आहे याचा अभ्यास करावा लागेल व नंतरच त्यावर एकजुटीने चर्चा करून त्यावर निर्णय घेण्यात येईल.

+1
869
+1
358
+1
662
+1
0
IPRoyal Pawns