*शिवसेवाची दीपावली आकाशकंदील व पणती पेंटींग कार्यशाळा २०२२*
*_ShivSeva’s Diwali Aakash kandil Making & Diwali Diya Painting Workshop_*
शिवसेवा मित्र मंडळ ठाणे, पूर्व तर्फे *रविवार दी १६ ऑक्टोबर २०२२, सकाळी ठीक १०.०० वा* (नावनोंदणी व प्रवेश प्रक्रिया सकाळी ९.३० पासून सुरू होईल) राजेंद्रपाल मंगला हिंदी हायस्कूल, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, पहिला मजला, लोकमान्य टिळक रोड, ठाणे पूर्व. येथे *प्रा. श्याम धुरी सर* यांच्या मार्गदर्शना खाली, *”आता आकाशकंदील बनवा आणी पणती रंगवा घरच्या घरी”*
या संकल्पनेअंतर्गत *”दीपावली आकाशकंदील व पणती पेंटींग”* या दीपावली विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे, या कार्यशाळेत वय वर्षं १० व वरील मुलांमुलींना तसेच *१० वर्षाखालील मुलांना आजी किंवा आजोबा किंवा आई किंवा बाबां बरोबर* सहभाग घेता येईल, यामध्ये पारंपरिक कलात्मक (करंजी कंदील) कंदील बनविण्याचे आणि वैविध्यपूर्ण पणती रंगविण्याचे मार्गदर्शन सर्वांना मिळणार आहे. आपण केलेले आकाशकंदील व आपण रंगवलेल्या पणत्या घरात लावून यंदाची दीपावली साजरी करण्याचा आनंद मुलांसह पालकांनाही घेता येणार आहे. या कार्यशाळेची प्रवेश फी प्रत्येकी *रु.१००/-* असून, या फी मध्ये दोन कंदिलाचे सर्व सामान, २ पणत्या व पणती पेंटिंग साठी लागणारे रंग आणी ब्रशचा सर्व खर्च अंतर्भूत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
९८३३१५८८००
९२२४१९९९७९
९९३०३२०९९८
कार्यशाळेत सहभागी होणारया सर्वांना कोव्हिडं १९ विषयक प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक असेल.
( सदरहू बातमी ही फक्त आपल्या माहिती करता असून mumbainews24x7 यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही कृपया याची नोंद घ्यावी )