प्रोजेक्ट मुंबईच्या वतीने एनयुजेमहाराष्ट्रचे गरजु माध्यमकर्मीना मदत!

कोरोना संकटामुळे इतर उद्योगाप्रमाणेच वृत्तपत्र व्यवसायावर संकट ओढावले. हजारोंच्या नोकर्‍या गेल्या! पगार बंद झाले, मुक्त पत्रकार, छायाचित्रकार, स्वतःची दैनिके, साप्ताहिक असणाऱ्यानाही कठीण दिवस आले. एनयुजे इंडिया नवी दिल्लीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना मीडियासाठी आर्थिक पॅकेज व माध्यमकर्मीना सहायता देण्यासाठी निवेदने दिली! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही चौथ्या स्तंभाला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी निवेदन दिले!
एनयुजेमहाराष्ट्र चे वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ नीलमताई गोर्‍हे, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील येड्रावकर तसेच संबंधित अनेक मंत्री महोदयांना ; या संकटात फ्रंटलाईन वर्कर्स सर्व माध्यमकर्मीचे सहायतेसाठी निवेदने देण्यात आली!
मात्र सरकारकडे अधिस्वीकृतीधारक ३ हजार पत्रकारांशिवाय परिपूर्ण डाटा तयार नाही. याच अडचणीमुळे महाराष्ट्रातील खरे गरजू माध्यमकर्मी सरकारी मदतीपासून वंचित राहिले असल्याचे एनयुजेमहाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी सांगितले.
कोरोनाने जीव गमावलेल्या माध्यमकर्मीचे कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारकडून मदत मिळाली नाही! काही राजकारणी मंत्री आपल्या मर्जीतील पत्रकारांवर मदतीची कृपा करताना दिसतात ही खंतही व्यक्त केली !
या पार्श्वभूमीवर एनयुजेमहाराष्ट्रचे निवेदनास सकारात्मक प्रतिसाद देऊन सातत्याने लोकसेवेचे काम करणाऱ्या प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व सीईओ शिशिर जोशी यांनी मुंबई व उपनगरातील गरजू माध्यमकर्मीसाठी जीवनावश्यक वस्तूंचे संच दिले.
त्याचे वितरण एनयुजेमहाराष्ट्रचे दादर येथील कार्यालयात करण्यात येत आहे. एनयुजेमहाराष्ट्चे संस्थापक, मार्गदर्शक शिवेंद्रकुमार व अध्यक्ष शीतल करदेकर यांचेसह कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांनी या सहायतेसाठी प्रोजेक्ट मुंबईचे शिशिर जोशी यांचे आभार मानले.या कामी सामाजिक कार्यकर्ते, मुक्त पत्रकार श्रीनिवास चारी, रफीक सिद्धीकी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले!
संघटन सचिव कैलास उदमले यांनी बेळगावसह राज्यभरात एनयुजेमहाराष्ट्रचे जनसेवा व माध्यमक्षेत्रातील गरजुना विविध प्रकारे सहकार्य करणे सुरू असल्याचे सागितले! तर सरचिटणीस सीमा भोईर यांनी सागितले की, प्रोजेक्ट मुंबई सारख्या समाजहितासाठी काम करणाऱ्या संस्थासोबत आम्ही नेहमीच असू !

*चौकट*
प्रोजेक्ट मुंबईचा उपक्रम ‘द मुंबई प्लास्टिक रिसायक्लोथोन’
*प्लास्टिक दान, बदल्यात गरजूंना धान्य!*
या वर्षभरात प्रोजेक्ट मुंबईचे वतीने ‘द मुंबई प्लास्टिक रिसायक्लोथोन’ हा उपक्रम राबवला जातो आहे. जे प्लॅस्टिक दिले जाईल त्या बदल्यात प्रोजेक्ट मुंबई, १० किलो धान्य गरजू कुटुंबीयांना देणार आहे! आपली एक चांगली कृती एका गरजू कुटुंबासाठी सहायक ठरू शकते असे आवाहन प्रोजेक्ट मुंबई चे संस्थापक शिशीर जोशी यांनी केले आहे. दि ३० मे पर्यत नाव नोंदणी करणे व ४ जून ला आपल्या घराजवळील दिलेल्या ठिकाणी प्लास्टिक देणे आहे! (www.projectmumbai.org)

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns