रत्नागिरी शहरामध्ये भाजपाला मोठा धक्का
भाजपाच्या महिला शहर अध्यक्षा
सौ.राजश्री शिवलकर यांचा शिवसेनेत प्रवेश
रत्नागिरी/मिलिंद बेर्डे
रत्नागिरी शहरातील भाजपाच्या महिला शहर अध्यक्षा सौ.राजश्री शिवलकर व त्यांचे पती बिपीन शिवलकर यांनी शिवसेना उपनेते डॉ.आमदार राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपाला मोठा धक्का बसला असुन एकच खळबळ उडाली आहे.
भाजपाच्या महिला शहर अध्यक्षा सौ.राजश्री शिवलकर हया माजी नगसेविका असुन राज्यात भाजपाची सत्ता आली असुनही सौ.राजश्री शिवलकर ऐन नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने येथे भाजपाला चांगलाच धक्का बसला आहे. शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे सौ.राजश्री शिवलकर यांनी स्पष्ट करताना शहराच सर्वांगिण विकास हे आपले ध्येय असुन शिवसेनेच्या माध्यमातून हे आपण निश्चितपणे साध्य करु अशी प्रतिक्रिया सौ.राजश्री शिवलकर यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
सदर प्रवेशाप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी,युवासेना कार्यकारणी सदस्य पवन जाधव,विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे,उपजिल्हाप्रमुख शहर संजय साळवी,उप जिल्हाप्रमुख सुजित किर,युवासेना जिल्हा युवाधिकारी विनय गांगण,उपजिल्हा युवाधिकारी हेमंत खातू, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत,शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहर प्रमुख महेश पत्की, बावा चव्हाण, तालुका कार्यालय प्रमुख संदीप सुर्वे, शहर युवाधिकारी आशिष चव्हाण, मुंबई समन्वयक अथर्व साळवी आदी उपस्थित होते.