युवासेना जिल्हा प्रमुख विनय गांगण यांच्यावतीने रामेश्वर विद्यालयाला संगणक प्रदान
लांजा – प्रतिनिधि / मिलिंद बेर्डे
या मातीत मी शिकलो आहे. त्यामुळे या कोंडगे गावच्या मातीचा मी कायम ऋणी असुन भविष्यात ही रामेश्वर विद्यालयाला काही गरज पडली तर मी नक्कीच माझा खारीचा वाटा उचलेन असे मत युवासेना जिल्हा प्रमुख विनय गांगण यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत संगणक प्रदान कार्यक्रमा वेळी कोंडगे येथे बोलताना व्यक्त केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रामेश्वर विद्यालय कोंडगे येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन युवासेना जिल्हा प्रमुख विनय गांगण यांच्यावतीने रामेश्वर विद्यालयाला संगणक प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना, या मातीत मी शिकलो आहे. त्यामुळे या मातीचा मी कायम ऋणी असुन कोंडगे परिसरातील लोकांनी आपल्या वडिलांना ही खुप प्रेम दिल्याचे त्यानी नमुद केले व त्याबद्दल त्यानी आभार व्यक्त केले. तर यापुढे ही विद्यालयाला कोणती गरज भासली तर मी नक्कीच माझा खारीचा वाटा उचलेन असे आश्वासन यावेळी बोलताना त्यानी दिले. दरम्यान, पंचायत समितीची निवडणूक येऊ घातली आहे. या निवडणुकीत विनय गांगण यांना भांबेड गणातुन उमेदवारी द्यावी अशी मागणी काही दिवसांपुर्वीच परिसरातील युवासेनेच्या कार्यकर्त्याकडुन करण्यात आली होती. निवडणुकीची ही पुर्वेतयारी तर नाही ना अश्या चर्चेला उधान आले आहे.
यावेळी, उल्का विश्वासराव, अथर्व साळवी, माजी. जि. प अध्यक्ष जगदिश राजापकर, उप तालुका प्रमुख दिलिप पळसुळेदेसाई, भांबेडचे उपसरपंच राजेंद्र गांधी, युवासेना विभाग प्रमुख प्रमोद गुरव, कोंडगे शाखा अधिकारी सचिन बेर्डे, जेष्ठ शिवसैनिक पुंडलिक बेर्डे, महेश विश्वासराव, सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र लाड, भांबेड परिसर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष – महेंद्र गांगण, खजिनदार – प्रमोद गांगण आदी मान्यवर उपस्थित होते..