‘संध्याकाळ’चा सारीपाट……अवांछित

‘संध्याकाळ’चा सारीपाट……

सचिन चिटणीस…….
आजकाल आपल्याला जवळजवळ प्रत्येक घरटी एक तरी मुलगा अथवा मुलगी फॉरेनला कामाला असल्याचे समजते. म्हातारपणी आपली काळजी करणारी आपल्या मागे आपली मुले आहेत असा विचार करणारे वयोवृद्ध मात्र, पिलं घरट्यातून उडून गेल्यानंतर एकाकी जीवन जगत असल्याचे आपल्याला दिसते आणि मग काही महिन्यांनी त्यांची रवानगी वृद्धाश्रमात होते. एकदा आपण आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात नेऊन सोडले म्हणजे आपण आपले कर्तव्य केले या भावनेतच आजकालची पिढी जगत असते, या जीवनातील संध्याकाळच्या सारीपाट दिग्दर्शक शुभो बासू नाग यांनी मांडला आहे. चित्रपट थोडा संथ झाला असला तरी आपल्या मनाची पकड घेतो.

कोलकातातील ‘निरुपमा वृद्धाश्रम’ एक जोडपे व त्यांचा लहान मुलगा अलिबाग सोडून कोलकात्यात रहावयास येतात. मधुसूदन गव्हाणे ( किशोर कदम ) त्यांची पत्नी मृणाल कुलकर्णी या दोघांचा एक लहान मुलगा असे तिघेजण राहत असतात. मधुसूदन निरुपमा वृद्धाश्रमात काम करत असतात व तेथे ते मधुदा नावाने ओळखले जात असतात. या वृद्धाश्रमात मोहन आगाशे ( दासबाबू ), सुहास जोशी व इतर वृद्ध आपापल्या कुटुंबातील काही अडचणीमुळे तिचे राहत असतात मात्र मधुदा त्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करत असतात. वृद्धाश्रमाला ७५ वर्षे पूर्ण झालेली असतात व त्या निमित्ताने एक छोटेखानी कार्यक्रम ही झालेला असतो.

मधूदा यांची पत्नी त्यांचा मुलगा लहान असतानाच मरण पावलेली असते व आपल्या वडिलांच्या वृद्धाश्रमावर असलेल्या प्रेमामुळेच ते आपल्या आईकडे नीट लक्ष न दिल्यामुळे आपली आई मरण पावली हे त्या छोट्या तपनच्या मनात बसले असते आणि म्हणूनच त्याच्या आणि वडिलांच्या मध्ये संबंध तितकेसे चांगले नसतात.
तपन ( अभय महाजन ) लेक्चरर म्हणून एका महाविद्यालयात शिकवत असतो. अचानक एके दिवशी त्याला अशिमा ( मृण्मयी गोडबोले ) भेटते आशिमा ही श्रीमंत असून घटस्फोटित असते मात्र हळूहळू या दोघांच्यात प्रेम वाढू लागते व ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. आशिमा घटस्फोटित असल्याने मधुसूदन यांना ते पसंत नसते! मात्र ते लग्न करून येतात हळूहळू आशिमा मधु दादांचा विश्वास संपादन करते व त्यांचे वृद्धाश्रमातील कामही पाहते इथे तपन ला कॅनडा होऊन लेक्चरर ची नोकरी येते तपन आशिमासह कॅनडाला जावयास निघतो व तो आपल्या वडिलांनाही बरोबर येण्याची विनंती करतो. मधुसूदन आयुष्य हे निरुपमा वृद्धाश्रमाशी जोडलेले असते तरीही ते…..
मधुसूदन आपल्या मुलाबरोबर कॅनडाला जातात का निरुपमा वृद्धाश्रमातच राहतात?
दिग्दर्शक शुभो बासू नाग यांनी आजच्या जगातील वृद्ध व तरुण यांच्यातील दरी खूप चपखल पणे मांडली

आहे.

 

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns