- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत ५ जून रोजी होणारा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्याची माहिती दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः ट्विट करत अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करत असल्याचे सांगितले आहे. यावर समाज माध्यमातून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्याचा त्रास त्यांना एक ते दीड वर्षापासून होत होता. पायाच्या दुखण्यामुळेच राज ठाकरे पुणे दौरा अर्धवट सोडून माघारी परतले होते. आता या दुखण्याचा त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने पुण्यात डॉक्टरांचा सल्ला घेऊन अयोध्या दौऱ्याची पुढील तारीख ठरवली जाणार असल्याचे कळत आहे.
राज यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधून कडाडून विरोध करण्यात आला होता. मात्र राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम
होते. परंतु, आता मात्र, राज ठाकरेंनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला असल्याची माहिती दिली आहे. राज ठाकरे यांनी ट्वीट करून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली.
मात्र, त्याचवेळी या मुद्यावर सविस्तरपणे बोलण्यासाठी पुण्यातील सभेत येण्याचे आवाहन राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना केले आहे.