ऑक्टोबर २०२० पासून कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड बंद केला आहे.
२०२१ फेब्रुवारी, मार्च, एप्रिल तीन महिने पगार दिलेला नाही.
२०२० पासून कर्मचाऱ्यांना फक्त ७ हजार पगार तर व्यवस्थापकांना १७ हजार पगार म्हणजेच अर्धापगार देण्यात येत आहे.
सहा वर्ष झाली पगार सुद्धा वाढवला नाही.
पगारा बद्दल नाट्यपरिषदेला तसेच सेक्रेटरी शरद पोंक्षे यांना पत्र लिहिलं, तोंडी कळवलं तरीही त्यांच्याकडून अद्याप काहीही उत्तर आलेले नाही. , असे व्यवस्थापक सुनील कदम यांनी मुंबई न्यूज शी बोलतांना सांगितले.
यापुढे कसं करायचं हा यक्षप्रश्न डोळ्या समोर उभा ठाकलाय त्यातच चक्रीवादळा मुळे गेले दोन दिवस पडलेल्या पावसाने माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात प्रचंड गळती, लवकरच त्याची दुरुस्ती झाली नाही तर दुरुस्तीवरील खर्च वाढतच जाणार. लॉकडाऊन नंतर नाटके सुरू झाली तरी अजून किमान वर्षभर तरी नाट्यगृह चालू होण्याची शक्यता कमीच, त्याचप्रमाणे नाट्य परिषदेमध्ये पदाधिकारी, नियामक मंडळ सदस्य यांच्यामध्ये चाललेला आरोप प्रत्यारोपाचा खेळ यासर्व अडचणी सोडवण्यासाठी अध्यक्ष माननीय शरद पवार यांनाच गळ घालायची व आपली बाजू त्यांच्या पुढे मांडायची असे ठरले, त्याप्रमाणे सुनील महाजन , अध्यक्ष नाट्य परिषद कोथरूड ( पुणे ), अ.भा.मराठी नाट्य परिषद , मुंबई ( नियामक मंडळ सदस्य ) यांनी माननीय शरद पवार यांना पत्र पाठवले असून आता यातून तुम्हीच मार्ग काढावा अशी कळकळीची विनंती केली आहे.
सदरहू पत्र खलील प्रमाणे-
प्रति , माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब
विश्वस्थ, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई.
विषय – नाट्य परिषदेच्या नाट्यगृहातील व्यवस्थापक व कर्मचारी यांचे पगार करणे बाबत
महोदय ,
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल येथील नाट्यगृहाचे व्यवस्थापक व कर्मचारी यांचे पगार न केल्या मुळे यांचे कुटुंब आर्थिक अडचणींना तोंड देत आहे . करोनाच्या काळात मुंबई सारख्या शहरात सध्या जगणे मुश्किल होत चालले आहे अश्या काळात त्यांना आपण आर्थिक मदत करत नाही याचे मला दुःख होत आहे
गेले अनेक वर्ष नाट्यगृहाची वास्तू ते अतिशय प्रामाणिकपणे देखभाल करत आहे अश्या संकट काळात आपण विश्वस्त या नात्याने या विषयात लक्ष घालून त्यांना कश्या प्रकारे सहकार्य करता येईल या संदर्भात मार्गदर्शन करावे
गेली वर्षभर नाट्य संकुल बंद असून दि १७ व १८ मे रोजी झालेल्या पावसामध्ये नाट्यगृहामध्ये गळती सुरु झाली आहे या मुळे नाट्यगृहाची अवस्था आणखी वाईट होत चाल्ली आहे या मधेही आपण वेळ काढून त्या संदर्भामध्ये काम करण्यासाठी सूचना द्याव्यात हि विनंती
टीप – सोबत नाट्यगृहाच्या पावसाळी गळतीचे फोटो आपल्या माहितीसाठी पाठवत आहोत
एकंदरीतच नाट्य परिषदेमध्ये पदाधिकारी नियामक मंडळ सदस्य यांच्या मध्ये चाललेला आरोप प्रत्यारोपाचा खेळ लवकर संपवून या सर्व कामास कशी उभारी देता येईल या संदर्भात आपले मार्गदर्शन अपेक्षित आहे
आपला कृपाभिलाषी ,
सुनील महाजन , अध्यक्ष नाट्य परिषद कोथरूड ( पुणे )
आ.भा.मराठी नाट्य परिषद , मुंबई ( नियामक मंडळ सदस्य )
मो – ९३७१०१०४३३
ए-मेल: samwad.pune@gmail.com
पत्ता – ७/३, प्रतीक नगर , पौड रोड , कोथरूड ४११०३८ , पुणे.