संगीतकार राम-लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण ( विजय पाटील ) यांचे निधन

जेष्ठ संगीतकार राम-लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण ( विजय पाटील ) यांचे नागपूर येथे निधन झाले. राम लक्ष्मण यांनी तब्बल ९२ चित्रपटांना संगीत दिले. दादा कोंडकेचे ते आवडते संगीतकार होते.
त्यांचे मूळ नाव विजय काशीनाथ पाटील होते. गेल्या
काही दिवसांपासून ते आजारी होती. अखेर शनिवारी पहाटे २ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी
दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
ऐन विशीत विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत एन्ट्री केली. सुरेंद्र हेंद्रे या बासरीवादकाशी त्यांची ओळख झाली. दादा कोंडकेंनी विजय पाटील आणि सुरेंद्र हेंदेंना आपल्या सिनेमाला संगीत देण्याची ऑफर दिली. विजय पाटील यांना घरात लखन असे म्हणत. दादांनी तेच लक्षात ठेवत या जोडीचे नाव राम-लक्ष्मण असे केले. पुढे त्याच नावाने त्यांनी संगीतकार म्हणून ओळख निर्माण केली.
हेंद्रे यांच्या निधनानंतर सुध्दा हेच नाव कायम ठेवत
विजय पाटील यांनी चित्रपट संगीतबद्ध केले.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns