नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती होऊन त्यात २४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असतानाच असा अपघात आघात करतो. ‘हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे’ मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर करत, ‘महाराष्ट्र शोकमग्न आहे’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
+1
+1
+1
+1