चौथ्या स्तंभाच्या सन्मानासाठी ‘ माई (मीडिया असोसिएशनऑफ इंडिया!)’ व्दारे मुंबईत मुक्त संवादाचे आयोजन

*चौथ्या स्तंभाच्या सन्मानासाठी ‘ माई (मीडिया असोसिएशनऑफ इंडिया!)’ व्दारे मुंबईत मुक्त संवादाचे आयोजन*

*चौथ्या स्तंभाच्या सन्मानासाठी मुक्त संवाद*
*पत्रकार..माध्यमे आणि वर्तमान आव्हाने*
या विषयावर दि २६ जुन रोजी दु २वाजता *यशवंतराव चव्हाण सेंटर *ऋणानुबंध हाॅल* तळमजला येथे *मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया* (माई) च्या पुढाकाराने
१ला देशव्यापी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकारितेतील आव्हाने मालक, प्रकाशक ,संपादक, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आदी माध्यमातील पत्रकार , फोटोजर्नालिस्ट, विडिओ जर्नालिस्टस आदी माध्यमांतील सर्व घटकांचे जगण्याचे प्रश्न खूप आहेत, मात्र यावर खुलेपणाने बोलले जात नाही.
वेजबोर्ड बंद होणे, कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसणे, चौथा स्तंभ म्हणून हितकारी कल्याणकारी मंडळ नसणे ,ज्येष्ठ पत्रकारांच्या समस्या आदि अनेक विषय आहेत!
नवा पत्रकार कायदा माध्यमकर्मी हितासाठी जे निर्देश देतो त्याची अंमलबजावणी होत नाही मात्र जे दोन घातक स्तंभ (काॅलम) आहेत त्यांची अंमलबजावणी जोरात होते!
हा मोठा विरोधाभास आहे!
१जुलैपासून नवे कायदे अंमलात येणार आहेत त्याने सर्वसामान्यांसह मीडिया,पत्रकार होरपळून निघणार आहे!
आणि लोकशाही सक्षम होण्यासाठी, माध्यमकर्मींच्या बळकटीसाठी मुक्त संवाद अत्यावश्यक आहे!
आणि म्हणूनच माई या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने दि २६ जुन २०२४ रोजी ‘पत्रकार..माध्यमे आणि वर्तमान आव्हाने’ या मुक्त संवाद करणार आहोत! अशी माहिती संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी दिली.
ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी व किशोर आपटे ,चेतन काशीकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ एड नितीन सातपुते हे प्रमुख वक्ते आहेत!
तसेच देशभरातून आलेल्या समस्यांवर संवाद होणार आहे!
सर्व क्षेत्रातील माध्यमकर्मींना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन माई च्या वतीने माईचे मुंबई संघटन सचिव सचिन चिटणीस यांनी केले आहे!
या संवादाला सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे आणि देशभरात हा आवाज पोहोचणार आहे त्यासाठी सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे माई चे सरचिटणीस डॉ सुभाष सामंत यांनी सांगितले.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns