पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले…
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशासमोर आणखी एक संकट आले आहे.
कोरोनात जीव गमावलेल्या सर्वांना श्रद्धांजली.
देशभरात सध्या ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे.
ऑक्सिजनच्या तुटवड्यावर प्रत्येक स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या काही दिवसात उचललेल्या पावलांना आणखी मजबूत करू.
औषधांचं उत्पादन वाढवण्यासाठी कंपन्यांना पूर्ण सहकार्य केलं जातंय.
भारताकडे प्रचंड मोठी फार्मा इंडस्ट्री आहे त्याचा देशाला फायदा होईल.
ऑक्सीजनची रेल्वे असो किंवा ऑक्सिजन निर्मिती असो काम जोरात सुरू आहे.
आपल्या शास्त्रज्ञांनी प्रचंड मेहनत केली त्याचे फळ आज आपल्याला मिळते आहे.
भारताने जगातली सर्वात स्वस्त लस तयार केली.
दोन मेड इन इंडिया लसींमुळेच जगातले सर्वात मोठे अभियान सुरू झाले.
जगात सर्वाधिक वेगाने लसीकरणाची मोहीम राबवली गेली.
आज पर्यंत बारा कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
१ मे पासून १८ वर्षावरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे.
पहिला लाटे पेक्षा दुसऱ्या लाटेची परिस्थिती भिन्न आहे.
आता आपल्याकडे टेस्टिंग आहे उपचार आहे कोविड सेंटर्स आहेत.
अर्थचक्र आणि उद्योगविश्व सुरू राहील याची काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
श्रमिकांनाही तातडीने कोरोना लस मिळेल अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे.
मजुरांनी जिथे आहे तिथेच थांबावे स्थलांतर करू नये. स्वच्छता अभियानात लहान मुलांनी घरातल्या लोकांना धडे दिले होते तेच आताही गरजेचे आहे. बालमित्रांनी आपल्या घरातल्या लोकांना कोरोनाचं गांभीर्य पटवून द्यावं.
तरुणांनी कोविड नियमां बद्दल आपल्या परिसरात जागृती करावी.
प्रसारमाध्यमांनी लोकांना सतर्क आणि जागरूक करण्याचं काम करावं.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशासमोर आणखी एक संकट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
+1
+1
+1
+1