मिलिंद कवडे म्हणताहेत ‘ह्यावेळी जरा मोठ्ठा झालाय!’

सचिन चिटणीस…..
आज समाज फॉरवर्ड झालेला असूनही ज्या गोष्टीची चार चौघात चर्चा करताना बुजतो अशा समाजाला आपल्या हलक्याफुलक्या शैलीत सहजपणे सेक्स बद्दलची माहिती पटवून देण्याच्या हातखंडा असलेला, शुद्ध विनोदांना प्रसंगाची अचूक जोड देणारा, नवनवीन प्रयोग करणारा , वाह्यातपणा किंवा थिल्लरपणाला महत्व न देणारा प्रयोगशील दिग्दर्शक मिलिंद कवडे लवकरच सेक्स वरती अधिक खोलात जाऊन आपल्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना विनोदाची जोड देत माहिती देणारा चित्रपट घेऊन येत आहे.
आज त्याने समाज माध्यमावर टाकलेले त्या चित्रपटबद्दलचे पोस्टर बघून प्रेक्षकांचे डोळेच विस्फारले गेले आहेत मात्र मिलिंद कवडेंशी या बद्दल बोललो असता “आज समाजात ठिकठिकाणी जे चालले आहे ३ आणि ४ वर्षाच्या मुलींवर नराधमां कडून अत्याचार होत आहेत, रस्त्यावर फिरतांना बायका मुलींना जो मनस्ताप सहन करावा लागतो आहे, हे सर्व सेक्स बद्दल अज्ञान असल्याने होत आहे. शाळेपासूनच जर या विषयाचे शिक्षण दिले गेल्यास आज जो काय प्रकार चालला आहे त्याला बऱ्यापैकी अंकुश बसेल असे मला वाटते.
मी माझ्या चित्रपटाद्वारे लोकांच्या मनात सेक्स विषयीचा गोंधळ दूर करायचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे या प्रयत्नाने एका माणसाचे जरी प्रबोधन झाले तरी माझी मेहनत फळाला आली असे मी समजेन” मिलिंद कवडे असे म्हणाले.
चित्रपटाचे नाव अर्थात दोन दिवसात मिलिंद कवडे जाहीर करणार आहेत. लागलीच शूटिंग सुरू करून दिवाळीत त्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये मध्ये प्रदर्शित करावयाचा आहे.
या चित्रपटातील कलाकार आपले नेहमीचेच आहेत हे सांगणे न लगे.

तर मिलिंद कवडे यांचा ‘ह्यावेळी जरा मोठ्ठा झालाय!’ ते काय आहे हे दोन दिवसात लोकांना कळेलच तोपर्यंत आपण मनातल्या मनात विचार करूयात…….

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns