मराठी रंगभूमीवरील जेष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे ( ९१ ) यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या पुण्याच्या घरी निधन झाले.
‘प्रपंच’ हा मोघे यांनी केलेला पहिला चित्रपट असून या चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळाले होते. त्यांनी साठ पेक्षा अधिक नाटके, तर पन्नास पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले असून यात हिंदी व इंग्रजी सुद्धा चित्रपट सामील आहेत. या क्षेत्रात सहा दशकांहून अधिक वर्षाचा अनुभव तर पु ल देशपांडें सोबत पन्नास वर्षे
मोघे यांचे सिंहासन, उंबरठा, सूत्रधार, आम्ही जातो आमच्या गावा हे चित्रपट, तर अश्रूंची झाली फुले, वाऱ्यावरची वरात, लेकुरे उदंड झाली,अशी पाखरे येती, यासारखी अनेक नाटके प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.
श्रीकांत मोघे यांना त्यांच्या अभिनय क्षेत्रातील योगदाना बद्दल मिळालेले पुरस्कार, राज्य सरकारचा प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, राज्य शासनाचा कलागौरव पुरस्कार, काशिनाथ घाणेकर पुरस्कार, गदिमा पुरस्कार.