सचिन चिटणीस….. या चित्रपटाला मिळताहेत तीन स्टार
द्विअर्थी संवादाने ठासून भरलेला, डोके बाजूला ठेवून घटकाभर मनोरंजन करावयाचे असल्यास दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवचा चोरीचा मामला हा चित्रपट बघावयास काहीच हरकत नाही. कथेचा जीव फारच छोटा असला तरी प्रियदर्शन जाधवचीच कथा असून तो त्यात रंग भरण्यात यशस्वी झाला आहे.
नंदन ( जितेंद्र जोशी ) एक प्रामाणिक चोर असतो, आता तुम्ही म्हणाल प्रामाणिक चोर म्हणजे काय? तर तो ज्या घरात चोरी करावयास जातो तेव्हा आपल्याला जेवढ्या पैशाची निकड असेल तेवढेच पैसे चोरतो.
नंदनची बायको आशा ( कीर्ती पेंढारकर ) सुद्धा प्रामाणिक व भोळी आहे नंदन चोरी करायला गेल्यानंतर त्याच घरात ही फोन करून नंदन बरा आहे ना याची सारखी चौकशी करते. पण तिच्या याच वागण्यामुळे नंदन जेव्हा आमदार अमरजित पाटील ( हेमंत ढोमे ) यांच्या फार्महाऊसवर चोरी करावयास जातो तेव्हा आशाच्या या वागण्यामुळे नंदन अडचणीत सापडतो कारण त्याच वेळेस अमरजीत पाटील त्याच्या श्रद्धा ( अमृता खानविलकर ) या मैत्रिणी सोबत तिथे आलेला असतो मात्र त्याचे तिथे येणे व तेही त्याच्या मैत्रिणी बरोबर हे त्याची बायको अंजली ( क्षिती जोग ) हिला माहीत नसते. अंजलीचा मित्र असतो ( अभिनंदन ) अनिकेत विश्वासराव व तो पोलीस असतो अंजली त्याच्यावर अमरजीत पाटील कुठे गेलेत याची चौकशी करायला सांगते मात्र संशय आल्याने तीही फार्महाऊस वर पोहोचते.
तेव्हाच नंदनची बायकोही आपल्या दोन मुलींसह त्या फार्महाऊसवर पोहोचते आणि मग सुरु होतो एकच गोंधळ हा गोंधळ बघायचा असल्यास आपल्याला चित्रपटगृहातच जावे लागेल.
सर्व कलाकारांनी केलेले उत्तम काम, विनोदाचे साधलेले परफेक्ट टाइमिंग त्यातही जितेंद्र जोशीचा कमाल अभिनय दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवची चित्रपटावरील पकड, या सर्व गोष्टीमुळे चोरीचा मामला फक्कड जमून आला आहे.
निर्मिती संस्था – स्वरुप स्टुडिओज
प्रस्तुती – एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट
निर्माते – सुधाकर ओमळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, स्मिता ओमळे
सहनिर्माते – अनिरुद्ध अंकुश पाटील
कथा/दिग्दर्शन – प्रियदर्शन जाधव
पटकथा/संवाद – प्रियदर्शन जाधव आणि हरीश कस्पटे
छायाचित्रण – शब्बीर नाईक
संकलन – निलेश गावंड
गीते – जितेंद्र जोशी, मंगेश कांगणे, जय अत्रे
संगीत – चिनार महेश ( अल्बम काढाल काय, ताण
तणाव )
प्रफुल्ल स्वप्नील ( शीर्षक गीत – चोरीचा मामला )
पार्श्वसंगीत – आदित्य बेडेकर
गायक/गायिका :-
अल्बम काढाल काय ( शाल्मली खोलगडे )
ताण तणाव ( चिनार खारकर, प्रियांका बर्वे )
चोरीचा मामला ( स्वप्नील गोडबोले, कविता राम)
कला – सतीश चिपकर
नृत्यदिग्दर्शन – सुजित कुमार
*कलाकार*
अमृता खानविलकर – श्रद्धा
जितेंद्र जोशी – नंदन
हेमंत ढोमे – अमरजित पाटील
अनिकेत विश्वासराव – अभिनंदन साहेब
क्षिती जोग – अंजली पाटील
कीर्ती पेंढारकर – आशा
रमेश वाणी – हवालदार