“तुकड्यावर नव्हे तर, आम्ही शिकार करून खाणाऱ्यांची औलाद आहोत. मंत्रिपदासाठी नव्हे तर साताऱ्याच्या विकासासाठी आपण भाजपात गेलो आहोत.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवरी साताऱ्यात आली असता, उदयनराजे आणि शिवेंद्रराजे मुख्यमंत्र्यांसोबत एकाचं मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ट्रोल करणाऱ्यांवर टीका केली.
यावेळेस मुख्यमंत्र्यांचे स्वागत करतांना शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना तलवार भेट दिली तर उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना पारंपारिक राजेशाही पगडी घालून त्यांचे स्वागत केले.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात आमच्या मागण्यांकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप उदयनराजेंनी यावेळी केला. तसेच काँग्रेस – राष्ट्रवादीला त्यांच्या आजच्या अवस्थेबद्दल आत्मचिंतन करण्याचा सल्लाही दिला.
छायाचित्र – दीपक साळवी
+1
+1
+1
+1