मराठी नाट्यव्यावसायिक निर्माता संघ, मुंबई च्या नवीन कार्यकारिणीची निवड

*मराठी नाट्यव्यावसायिक निर्माता संघ, मुंबई च्या नवीन कार्यकारिणीची निवड*

*मुंबई, दि. १० ऑगस्ट २०२६* : मराठी रंगभूमीच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या *मराठी नाट्यव्यावसायिक निर्माता संघ, मुंबई* च्या ऑगस्ट २०२६ ते जुलै २०३१ या ५ वर्षांच्या कालावधीसाठी नवीन पदाधिकारी आणि कार्यकारिणीची निवड आज दि. १०/०८/२०२६, सोमवार रोजी *श्री. शिवाजी मंदिर, दादर बोर्ड रूम(दादर पश्चिम), मुंबई.* येथे दुपारी ०४:०० वाजता झालेल्या सभेत एकमताने करण्यात आली.

या सभेत खालील पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली:

*नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य*

१.  *अध्यक्ष* : श्री. राहुल भंडारे

२.  *उपाध्यक्ष* : श्री. ज्ञानेश महाराव

३.  *प्रमुख कार्यवाह* : श्री. श्रीकांत तटकरे

४.  *कोषाध्यक्ष* : श्री. संदीप विचारे

५.  *सह कार्यवाह* : श्री. अजय विचारे

६.  *सह कोषाध्यक्ष* : सौ. प्रिया पाटील

७.  *सदस्य* : श्री. अशोक नारकर

८.  *सदस्य* : श्री. प्रदीप कबरे

९.  *सदस्य* : श्री. दिपक नलावडे

१०. *सदस्य* : श्री. संतोष पवार

११. *सदस्य* : श्री. शेखर दाते

*सल्लागार मंडळ – एकमताने निवड*

१.  श्री. उदय धुरत

२.  श्री. नवनाथ (प्रसाद) मच्छिंद्र कांबळी

३.  श्री. संतोष भरत काणेकर

नवनियुक्त कार्यकारिणी आणि सल्लागार मंडळाच्या सर्व सदस्यांचे संघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. पुढील ५ वर्षात मराठी नाट्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी आणि नाट्यव्यावसायिकांच्या हितासाठी संघ सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

श्रीकांत तटकरे., प्रमुख कार्यवाह.  मराठी नाट्यव्यावसायिक निर्माता संघ, मुंबई

IPRoyal Pawns