नितीश भारद्वाज यांनी आपल्या IAS पत्नी वर केला मेंटल टॉर्चरचा आरोप
महाभारत फेम नितीश भारद्वाज यांनी आपल्या IAS पत्नी स्मिता घाटे यांच्यावर मेंटल टॉर्चरचा आरोप ठेवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच बुधवारी नितीश यांनी भोपाळचे पोलीस कमिशनर हरिनारायणचारी मिश्रा यांच्याकडे मदत देखील मागितली आहे.
यासोबतच त्यांनी त्यांची आयएएस पत्नी स्मिता यांच्यावर आरोप करत सांगितले की, ती त्यांना देवयानी आणि शिवरंजनी या त्यांच्या मुलींना भेटू देत नाही किंवा बोलू देत नाही. स्मिता तिच्या मुलींच्या शाळा बदलत राहते. त्यामुळे नितीश यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होत आहे.
नितीश यांची दोन लग्न झाली होती. पण त्यांची दोन्ही लग्ने टिकली नाहीत. १९९१ मध्ये त्यांनी मोनिषा पाटील यांच्यासोबत पहिले लग्न केले. मात्र २००५ मध्ये हे लग्न तुटले. यानंतर नितीशने स्मिता यांच्याशी लग्न केले. नितीश आणि स्मिता यांचे २००९ मध्ये लग्न झाले होते. दोघांना जुळ्या मुली आहेत.