खिळवून ठेवणारा ‘डाक’

सचिन चिटणीस

या चित्रपटाला मिळताहेत 3 स्टार

खिळवून ठेवणारा ‘डाक’

मराठीत भयपट चित्रपट एकतर फार कमी बनतात त्यात तो चित्रपट भयपट आहे का कॉमेडी आहे हे ठरवणे कठीण जाते. मात्र काही भयपट खूप चांगल्याप्रकारे प्रेक्षकां समोर सादर होतात. त्या पठडीतील निर्माता, दिग्दर्शक व लेखकाची भूमिका बाजावलेले महेश नेने यांचा डाक हा चित्रपट बसतो. थोडं कॅमेरावर अजून काम केले असते व संवाद साजेशे झाले असते तर डाक हा चित्रपट खरोखर उत्तम झाला असता.

गावात आपली आई ( संजीवनी जाधव ), बहीण ( भूमी शिरोडकर ), व वहिनी ( अश्विनी काळसेकर ) सोबत रहाणारा गोपाळ ( सिद्धार्थ मुळे ) चे गावातील जान्हवी ( वेदांगी कुलकर्णी ) या मुलीवर प्रेम असते तसेच तिचेही असते पण गोपाळला नोकरी नसल्याने जान्हवीच्या वडिलांचा हा लग्नाला विरोध असतो. म्हणून गोपाळ स्वतःला सिद्ध करण्यासाठी मुंबईत जातो दरम्यान गावातील सरपंचाच्या ( अनिकेत केळकर ) भावाला विक्रम ( ओम राणे ) जान्हवी आवडत असते यावरून विक्रम व गोपाळ यांच्या मध्ये भांडणेही होत असतात.

यातच अचानक गोपाळचा खून होतो. गोपळचे मुंबईतील पोलीस खात्यातील मित्र या गोष्टीचा छडा लावण्यासाठी गोपाळच्या गावी येतात. गावात शिरल्या पासूनच त्यांना धक्के बसायला सुरवात होते.

दिग्दर्शकाने सस्पेन्स व थ्रिल उत्तम राखले आहे, ओम राणेने खलनायक उत्तम वठवला आहे. अश्विनी काळसेकरने आपली भूमिका चोख बजावली आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns