‘रौंदळ’ नुसता जाळ….

‘रौंदळ’ नुसता जाळ….

सचिन चिटणीस, या चित्रपटाला मिळत आहेत 3.5 स्टार

आज आपण कितीही पुढारलेले म्हणत असलो तरी गावात शेतकऱ्याला बागायतदार, कारखानदार यांचा सामना करावाच लागतो ते बोलतील त्या भावाने त्याला आपला शेतमाल द्यावा लागतो. भले हे सर्व ठिकाणी होत नसेल पण काही ठिकाणी मात्र अजूनही हा प्रकार चालू आहे व त्याच घटनेवर ‘रौंदळ’ने ज्वलंत बोट ठेवले आहे.

चित्रपटातील हिरो शिवा (भाऊसाहेब शिंदे) हा साधा शेतकरी कुटुंबात पाडलेला मुलगा मात्र त्याला देश सेवा करण्यासाठी मिलिटरी मध्ये जायचे असते व त्यासाठी तो कडी मिळण्यात सुद्धा घेत असतो मात्र धावण्याच्या परीक्षेत तो मध्येच पडल्याने त्याला मिलिटरी स्वप्न अर्धवट सोडावे लागते मात्र त्याचे आजोबा पांडुरंग (संजय लकडे) त्याला शेती करून देशाची सेवा कर हा मूलमंत्र देतात. त्यांच्याकडे सात ते आठ एकर उसाची बागायती शेती असते. दोन बैल असतात, एक ट्रॅक्टर असतो शिवा आपल्या आजोबांचं म्हणणं मान्य करून शेतात ऊस पिकवतो मात्र बागायतदार व कारखानदार असलेले अण्णा (शिवराज वाळवेकर) शिंदे त्याचा ऊस घेत नाहीत व तसाच ठेवून देतात. का तर मेजरच्या गावातून फक्त ५० मतं अण्णांना पडल्यामुळे अण्णांची आमदारकी गेलेली असते याचा राग म्हणून अण्णा मेजरचा ऊस विकत घेत नाहीत याचा जाब विचारण्यासाठी मेजर जेव्हा अण्णांच्या ऑफिसमध्ये जातो तेव्हा तिथे अण्णांचा मुलगा बिट्टू शेठ (यशराज डिम्बले) असतो मात्र हा डोक्यांनी एकदम गरम डोक्याचा असतो व तो मेजरला उलट सुलट बोलून हाकलून लावतो.

इथून पुढे शिवा व बिट्टू मध्ये संघर्ष सुरू होतो पुढे काय घडते?
शिवा अन्यायाचा कसा बिमोड करतो
हे मोठ्या पडद्यावर पाहणे अधिक उचित राहील.

भाऊसाहेब शिंदे चिया चित्रपटात देहबोली अतिशय उत्तम जमून आलेली आहे. अभिनय फक्कड जमलाय, नंदा (नेहा सोनवणे) चा अभिनय व लुक दोन्ही छान मात्र तिला विशेष काम नाही आहे तरीही लक्ष वेधून घेते.

आणि व्हिलन बनलेला बिट्टू यशराज डिम्बले नुसता जाळ आहे. काही सिन मध्ये तर तो शिवाचाही वरचढ ठरतो याचे वर्तमान चांगले आहे.

गाणी छान जमून अली आहेत. सिनेमॅटोग्राफर अनिकेत खंडागळे चा कॅमेरा मस्त.

एकूणच चित्रपट जाळ आहे.

+1
1.2k
+1
2.1k
+1
69
+1
0
IPRoyal Pawns