रिक्षाला वाचवता वाचवता एसटी बेनी धरणात पडता पडता वाचली
लांजा (प्रतिनिधी) / मिलिंद बेर्डे।
समोरून आलेल्या रिक्षाला बाजू देताना एसटी चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ही एसटी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन विसावली. प्रवासांचे दैव बलवत्तर म्हणून ही बस येथील बेनी धरणात जाऊन पडता पडता वाचली. सोमवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून ३० मिनिटांच्या दरम्याने ही घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार लांजा एसटी बस स्थानकातून एम एच १४ बीटी ३००५ या क्रमांकाची लांजा -वाडगाव
ही बस घेऊन चालक अशोक पावस्कर हे वाडगाव च्या दिशेने चालले होते. दुपारी दीड वाजण्याच्या दरम्याने एसटी बेनी धरणा जवळ आली असता समोरून रिक्षा आली. अचानक रिक्षा समोर आल्याने एसटी चालकाने रिक्षाला साईट देण्याचा प्रयत्न केला असता ही एसटी बस रस्त्याच्या बाजूला जाऊन झाडावर जाऊन कलंडली. सुदैवाने या ठिकाणी असलेल्या झाडाला एसटी बस अडकल्याने ही एसटी बस बेनी धरणात जाऊन पडण्यापासून वाचली.
प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून मोठा अपघात टळला आहे. या अपघातात कोणीही प्रवासी जखमी झालेले नाही.