‘स्नेहबंध’ या शॉर्ट फ़िल्म चे पोस्टर अनावरण व प्रीमियर शो पार पडला.

लांजा /मिलिंद बेर्डे।
स्नेहबंध या शॉर्ट फ़िल्म चे पोस्टर अनावरण व प्रीमियर शो पार पडला.
लांजा मधील शॉर्टफ़िल्म मध्ये गरुड़ झेप घेणारी अमोल रंग यात्री या संस्थेने सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. या संस्थेने नुकतेच “स्नेहबंध “या शॉर्ट फिल्म ची निर्मिती केली .या शॉर्ट फिल्मचे पोस्टर अनावरण आणि प्रीमियर शो नुकताच सीनियर कॉलेज लांजा येथे पार पडला.
“स्नेहबंध” या शॉर्ट फिल्मचे लेखन दिग्दर्शन आणि संवाद लेखन अमोल रंगयात्री चे संस्थापक अमोल रेडीज यांनी केले आहे. याच्या छायाचित्रणाचे काम प्रसिद्ध कॅमेरामन दिनेश खेडेकर यांनी केले आहे. यातील कलाकार आहेत अमोल रेडीज, डॉक्टर भगवान नारकर, प्रमोद गुरव, स्मितल चव्हाण आणि अर्चना पेणकर (पांचाळ ). याचे कार्यकारी निर्माता आहेत डॉक्टर भगवान नारकर या फिल्मचे पोस्टर तयार केले आहे तनय गजानन पांचाळ आणि संजोग घेवडे यांनी. निर्माता डॉ भगवान नारकर, छाया चित्रकार दिनेश खेडेकर, कलाकार अर्चना पंचाळ, प्रमोद गुरव.
नुकत्याच झालेल्या फिल्मच्या उद्घाटन प्रसंगी इन्फीगो आय केअर सेंटर रत्नागिरीचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीधर ठाकूर देसाई, लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालक भाऊ वंजारे, लांजा सीनियर कॉलेजचे प्राचार्य कुलकर्णी सर उपस्थित होते. सीनियर कॉलेजचे प्राध्यापक मराठे सर, एडवोकेट कोळेकर यांनीही या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
स्नेहबंध मध्ये काम केलेल्या सर्व कलाकारांचा छायाचित्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सर्वच कलाकारांच्या भूमिका उत्तम झाल्याचे मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्वेसर्वा जयू शेठ पाखरे, शरद चव्हाण, शशांक उपशेटे, महेश बामणे, दिनेश खेडेकर, गजानन पांचाळ, जयू कुरतडकर, विजय शिंदे, अमित जाधव, डोर्लेकर, दयानंद चव्हाण, प्रदीप कांबळे, राकेश दळवी या सर्वांनीच मेहनत घेतली.
डॉक्टर भगवान नारकर निर्मित आणि अमोल रेडीज लिखित आणि दिग्दर्शित “स्नेहबंध “ही शॉर्ट फिल्म निश्चितच लोकांना आवडेल आणि एक छान नेत्रदानाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवेल अशी कौतुकाची थाप सर्वच मान्यवरांनी दिली.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns