उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत गुरुवारी मंजूर करण्यात आला. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवसेनेनं यावरून भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. ‘एखाद्या पक्षाच्या बैठकीत असा ठराव होणं हे आश्चर्यकारक
आहे. सीबीआय आणि ईडी हे भाजपचे सदस्य आहेत का,’ असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
+1
+1
+1
+1