महाराष्ट्रात कोरोनाच्या थैमानमुळे ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली असून उद्या रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत ही नवीन नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. व जो या नियमावलीचा भंग करेल त्याला १० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
लग्न समारंभास २५ जणांना उपस्थित राहण्यास परवानगी तसेच फक्त २ तासांचा अवधी.
लग्नाबद्दलचा नियम भंग करणाऱ्या लोकांना पन्नास हजाराचा दंड
लोकल फक्त अत्यावश्यक सेवांसाठी धावणार. सामान्यांना लोकल, मेट्रो प्रवास पूर्णपणे बंद.
सार्वजनिक बस वाहतूक ५०% क्षमतेने सुरू राहणार आंतरजिल्हा व अंतर शहर वाहतूक केवळ अत्यावश्यक सेवांसाठी.
खाजगी वाहतूक ही केवळ अत्यावश्यक सेवांसाठी सुरू राहणार
सरकारी कार्यालयात फक्त १५ टक्के उपस्थिती
किराणा मालाची दुकाने, भाजीविक्री सकाळी ७ ते ११ या वेळेतच उघडी राहणार
खाजगी बस सेवेने दुसऱ्या शहरात किंवा जिल्ह्यात प्रवेश केल्यास चौदा दिवस क्वाॅरंटाइन