मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला,
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला.
मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.
मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. अपघातात मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून येत होते
































