विरार येथील रुग्णालयात आग, १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू

नाशिक येथे ऑक्सीजन गळतीचे प्रकरण ताजे असतांनाच पालघर जिल्ह्यातील विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलच्या इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये एसीचा स्फोट झाल्याने आग लागून १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
विरारमधील विजय वल्लभ हॉस्पिटल हे चार मजली
असून दुसऱ्या मजल्यावर असलेल्या इंटेन्सिव्ह
केअर युनिटमध्ये रात्री सव्वातीन वाजेच्या सुमारास एसीचा स्फोट झाल्याने आग लागली असा प्राथमिक अंदाज आहे. रुग्णालयात एकूण १७ रुग्ण होते. त्यापैकी १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
मरण पावलेल्यांमध्ये ५ महिला आणि ८ पुरुषांचा
समावेश आहे. २१ रुग्ण अस्वस्थ झाले असून त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. इतर जे नॉन-कोव्हिड ८० रुग्ण आहेत ते सुरक्षित आहेत.

‘विरारमधील रुग्णालयातील आगीची घटना हृदय
पिटाळून टाकणारी, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश.

विरार येथील घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून मृतांना प्रत्येकी २ लाखांची मदत तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधान कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आली आहे.

विरार येथील रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे

घटनेत मृत झालेल्या व्यक्तींची नावे
१) उमा सुरेश कंगुटकर, (स्त्री/वय वर्ष ६३)
२) निलेश भोईर, (पु/वय वर्ष ३५)
३) पृथ्वीराज वल्लभदास वैष्णव, (पु/वय वर्ष ६८)
४) रजनी कडू, (स्त्री/वय वर्ष ६०)
५) नरेंद्र शंकर शिंदे (पु/वय वर्ष ५८)
६) जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (पु/वय वर्ष ६३)
७) कुमार किशोर दोशी (पु/वय वर्ष ४५)
८) रमेश उपयान (पु/वय वर्ष ५५)
९) प्रवीण शिवलाल गौडा (पु/वय वर्ष ६५)
१०) अमेय राजेश राऊत (पु/वय वर्ष २३)
११) शमा अरुण म्हात्रे (स्त्री/वय वर्ष ४८)
१२) सुवर्णा पितळे (स्त्री/वय वर्ष ६४)
१३) सुप्रिया देशमुख (स्त्री/वय वर्ष ४३)

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns