मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी कोरोना संबंधी संवाद साधला
-लग्न समारंभ राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाल्याने प्रादुर्भाव वाढला.
-मार्चपासून कोरोना अक्राळविक्राळ स्वरूपात वाढतोय. -मधल्या काळात आपण शिथिल झालो.
– सध्या राज्यात कोरोनाची चाचणी करणाऱ्या पाचशेपेक्षा जास्त लॅब.
– महाराष्ट्रात दररोज एक लाख ८२ हजार चाचण्यांची क्षमता.
– कोरोनामुळे जगाची आर्थिक परिस्थिती दोलायमान.
– कोरोनाच्या काळातही विरोधकांचा शिमगा.
– परिस्थितीतून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करण्यासाठी संवाद.
– राज्यात एकही रुग्ण लपवला नाही आणि लपवणार नाही
– मला विलन ठरवले तरी मी काम करत राहणारच
– लॉकडाऊनचा उपयोग संसर्ग थांबवण्यासाठी आणि आरोग्यसुविधा वाढवण्यासाठी केला
– फिल्ड हॉस्पिटल उभारणार महाराष्ट्र पहिले राज्य
– सध्या मुंबईतील रुग्ण संख्या दररोज साडेआठ हजारांवर पोहोचली आहे
– आज राज्यात 45 हजार रुग्णांची वाढ होण्याची शक्यता
– सध्या मुंबईतली रुग्ण संख्या दररोज साडेआठ हजारांवर पोहोचली आहे
– महाराष्ट्रात विलगीकरणाचे बेड ६२ टक्के भरलेले आहेत.
– राज्यातील परिस्थिती चिंताजनक.
– अशीच परिस्थिती राहिली तर सुविधा अपुरी पडण्याची भीती
– आरोग्य कर्मचारी’ डॉक्टर’ पोलिस यांची संख्या कशी वाढवणार
– अनेक डॉक्टर्स आरोग्य कर्मचारीही कोरोनाच्या विळख्यात.
– काल तीन लाख नागरिकांचे लसीकरण आतापर्यंत ६५ लाख नागरिकांचे लसीकरण
– लस घेतली तरी मास्क घालणं अनिवार्य.
– लसीकरणा नंतरही कोरोना संसर्गाची भीती कायम
– कोरोना संसर्गामुळे अमेरिकेतही सात कलमी कार्यक्रम
– सर्वपक्षीय आणि राज्य सरकारला सहकार्य करावे
– कोरोनाच्या काळात राजकारण नको
– इतर देशात कोरोना संसर्गामुळे पुन्हा लॉकडाऊनची वेळ.
– लॉकडाऊन हा खूप घातक पण आपण कात्रीत सापडलोय
– विरोधी पक्षांच्या लॉकडाऊन बाबतच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांची टीका
– लॉकडाऊन साठी सल्ला देणाऱ्या उद्योगपतीला ही मुख्यमंत्रांचा टोला
– रस्त्यावर उतरा पण नागरिकांना मदत करण्यासाठी
– मास्क न वापरणं यात कसले शौर्य
– एक-दोन दिवसात नियमावली जाहीर करणार
– राज्यात कडक निर्बंध लावण्यात येणार
– लॉकडाऊन टाळु शकतो पण नियम पाळण्याची गरज
– पंधरा वीस दिवसात हॉस्पिटल भरून जाण्याची भीती
– मी कोरोनाला हरवणार, मी कोरोनाला रोखणार असं प्रत्येकानं ठरवायला हवं
– जनतेच्या जिवाशी खेळ होईल असं राजकारण करू नका
– पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय मात्र आज लॉकडाउन जाहीर करत नाही.