फोडाफोडी टाळण्यासाठी शिवसेनेचे आमदार रंगशारदा मध्ये

फोडाफोडी टाळण्यासाठी शिवसेनेचे आमदार रंगशारदा मध्ये.

काँग्रेसनेही आपले आमदार मुंबईत बोलावले.

फोडाफोडीवर आमचा विश्वास नाही, आम्ही फोडाफोडी करत नाही – चंद्रकांतदादा पाटील.

 

 

 

———————————————————————–

सुधीर मुनगंटीवार गेल्या दोन दिवसां पासून गोड बातमी देणार….गोड बातमी देणार….म्हणत फिरत आहेत, आता ही गोड बातमी म्हणजे नेमकी कोणती? सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कोणाचे ‘लग्न’ वगैरे ठरले आहे ? अर्थात ‘गोड बातम्यांचे’ कितीही दाखले दिले तरी ‘पाळणा’ हलणार का? तो कसा हलेलं? हे प्रश्न आहेतच. आता महाराष्ट्राच्या दृष्टीने एकच गोड बातमी अपेक्षित आहे ती म्हणजे ‘शिवसेनेचा’ मुख्यमंत्री शपथ ग्रहण करणार आहे.
मागच्या सत्तेचा वापर पुढच्या सत्तेसाठी ‘थैल्या’ ओतण्यात होत आहे, पण शेतकऱ्यांच्या हाती कुणी दमडा ठेवण्यास तयार नाही. हे आम्ही फक्त मुद्दय़ांचेच बोलत आहोत. कुणी गुद्दय़ांवर येणार असेल तर आम्ही त्यालाही उत्तर देऊ. गुंडांचा धाक व पैशांचा प्रसाद कोणी वाटणार असेल तर मर्द मरगट्टा मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही. महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवून कुणालाही राज्य आणता येणार नाही. शिवसेना येथे तलवार घेऊन उभीच आहे.

IPRoyal Pawns