करोना काळात हौशी नाट्य संस्थांना शासनाकडून अनुदान रक्कम देण्यास काही कारणास्तव विलंब झाल्यामुळे राष्ट्रवादी चित्रपट साहित्य सांस्कृतिक विभागाने सतत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिवाचे रान केले असून आता तो प्रश्न मार्गी लागतोय हे कळताच त्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न नाट्यपरिषदेच्या कडून होताना दिसत आहे हा प्रकार त्यांनी ताबडतोब थांबवावा” अशी समज प्रदेश राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी नाट्यपरिषदेला दिला. यास नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्या व जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनी दुजोरा दिला.
या कथित आरोपाला उत्तर देताना नाट्यनिर्माता संघचे अध्यक्ष संतोष काणेकर म्हणाले “सविता मालपेकर, हौशि संस्थाना त्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करतायत . ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. ती त्यानी अवश्य करावी.
नाट्यपरिषदेने , ‘मातृसंस्था’ म्हणुन कर्तव्यबुद्धिने ‘स्वतंत्रपणे’ हौशि संस्थाना मदत जाहिर केली आहे. त्यात शासनाकडे अडकलेल्या मदतीचा काहिही संबंध नाही. ती त्याना मालपेकर ताईंच्या प्रयत्नाने मिळेलंच.
“पण मग यात परिषदेंने ‘श्रेय लाटण्याचा’ प्रश्न येतोच कुठे ? हे सगळं हास्यास्पद नाही का ? असो, चांगलं केलं तरी त्यात त्रास कसा देता येईल यासाठी या करोना काळात काहींनी पदवी संपादन केली आहे बहुतेक. नाट्य परिषदेच्या निधी वाटप प्रक्रियेवर आक्षेप घेताना खर्च केलेला इंटरनेट डाटा तसेच कागदपत्र प्रिंट, चॅरिटी ऑफिस चा प्रवास खर्च अश्या अनेक केलेल्या खर्चापेक्षा, नाट्य परिषदेने जे आवाहान केले होते त्यात स्वेच्छेने तेवढ्या खर्चाची रक्कम जमा केली असती तरी एखाद्याच भलं झालं असतं पण आपल्याकडे हे कोण सांगणार आणि सांगितलेलं कोण ऐकणार. प्रत्येकाला विचार आणि व्यक्ती स्वातंत्र्य आहेच.”