कोरोना- अनलॉक सुरू झाल्यापासून अर्थचक्राला गती मिळावी, यासाठी सुरक्षेची नियमावली (SOP) तयार करून विविध व्यवसायांना सुरू करण्यास परवानगी दिलीय. त्यानुसार नाट्यगृहे आणि नाटकाचे प्रयोगास परवानगी द्यावी, यासाठी ‘मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ-मुंबई’ने नाट्य व्यवसायाशी संबंधित घटक संस्थाची सहमती घेऊन राज्य शासनाला १५ सप्टेंबर २०२० रोजी ‘नमुना Sop’ सादर केला. तसेच, नाट्य व्यवसायाला आवश्यक उभारी देण्यासाठी सहाय्य व अर्थसहाय्यासाठीचे मागणी पत्र सादर केले होते.
त्या अनुषंगाने ३० सप्टेंबर २०२० रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी ‘मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ-मुंबई’च्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी मंत्रालयातील कार्यालयात वेळ दिला होता. या बैठकीत ‘नाट्य निर्माता संघ’चे अध्यक्ष संतोष काणेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव, प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे आणि ‘अ.भा.मराठी नाट्य परिषद’चे अध्यक्ष प्रसाद कांबळी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे मुख्य सचिव सौरभ विजय हेही यावेळी उपस्थित होते.
अध्यक्ष संतोष काणेकर यांनी ‘नाट्य निर्माता संघा’चे ‘नमुना-SOP’चे निवेदन व अर्थसहाय्य मागणी पत्र सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांना सादर केले. ते वाचून ‘या दोन्ही बाबत शासन सकारात्मक विचार करेल, अन्य विभागांशी चर्चा करून निर्णय घेईल,’ असे सांगितले.
*बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे*
1.
‘नमुना-SOP’तील मुद्दे लक्षात घेऊन सांस्कृतिक कार्य सचिवांना ‘शासकीय SOP’ तयार करण्याचे सुरू करण्याची मंत्र्याची सूचना.
2.
‘शासकीय SOP’ तयार करताना ‘मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ-मुंबई’ आणि ‘अ.भा.मराठी नाट्य परिषद’ यांचा सहभाग राहील. त्यासाठी लवकरच बैठक बोलण्यात येईल,असे मंत्र्यांनी सांगितले.
3.
नाट्य कलावंत संघ, रंगमच कामगार संघटना, नाट्य व्यवस्थापक संघ या घटक संस्थांच्या पदाधिकार्याबरोबरची बैठक कोरोना-सुरक्षा व्यवस्थेच्या सोयीसाठी ‘यशवंतराव चव्हाण नाट्यगृह’मध्ये व्हावी, अशी विनंती प्रसाद कांबळी यांनी केली. ती मत्र्यांनी तात्काळ मान्य करून १५ दिवसात बैठक घेण्याचे सांगितले.
4
शासकीय पातळीवर कोणताही निर्णय झाला नसताना, नाट्यगृह व नाट्य प्रयोग सुरू होत असल्याच्या जाहिराती मिडिया व सोशल मिडियातून केल्या जात आहेत. यातून कलावंत व रंगमंच कामगार यांची दिशाभूल केली जाते. हा भावनेशी खेळल्या जाणाऱ्या खेळाला अटकाव करणारी भूमिका आपण जाहीर करावी, अशी विनंती संतोष काणेकर यांनी केली. या प्रकारा बाबत मंत्री अमित देशमुख यांनी नाराजी व्यक्त करून आपली भूमिका जाहीर करू असे आश्वासन दिले.
5.
“अनुदान पात्र” नाटकांचे रखडलेले धनादेश कार्यवाही करावेत, अशी विनंती राहुल भंडारे यांनी केली. त्याची कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यशवंत नाट्यमंदिरात येऊन रंगकर्मींचे म्हणणे ऐकणार
+1
+1
+1
+1