महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागून १० दिवस उलटून गेले तरी अजून सत्तास्थापनेची कोंडी फुटत नसल्याने यावर आता सोशल मीडियावर लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावयास सुरवात झाली आहे, यात काही गमतीशीर प्रतिक्रिया देखील आहेत…..
“नायक चित्रपटातून आम्ही एक दिवसासाठी अभिनेता अनिल कपूर मुख्यमंत्री बनल्यावर काय करामत करू शकतो हे बघितले आहे, सबब जो पर्यंत महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नाही तो पर्यंत अभिनेता अनिल कपूरलाच मुख्यमंत्री बनवा” विजय गुप्ता नावाच्या ट्विटर हॅण्डलवरून हे ट्वीट करण्यात आले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आदित्य ठाकरे यांना टॅग करत “क्या सोच रहे हो” असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.
या ट्विट वर अनिल कपूर ने मात्र “मैं नायक ही ठीक हूं” असे उत्तर दिले आहे.
+1
+1
+1
+1