थरारक शोधावर आधारित “मिरांडा वॉर्निंग” चा टीजर लाँच

*थरारक शोधावर आधारित “मिरांडा वॉर्निंग” चा टीजर लाँच*

*”मिरांडा वॉर्निंग” चित्रपटात दमदार कलाकारांचा अभिनय*

*”मिरांडा वॉर्निंग” २७ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात*

फार्महाऊसवर झालेल्या खुनाच्या थरारक शोधाची गोष्ट “मिरांडा वॉर्निंग” या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २७ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत असून नुकताच या चित्रपटाचा रंजक टीजर सोशल मीडियावर लाँच झाल्यामुळे चित्रपटाविषयी आता कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे.

सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज मार्फत “मिरांडा वॉर्निंग” या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे तर अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटच्या सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्रच्या कल्पक जोशी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. त्यांनी या पूर्वी २०२३ मध्ये ‘गेट-टुगेदर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर ‘मिरांडा वॉर्निंग’ या चित्रपटातून त्यांनी वेगळा प्रयोग केला आहे. रवींद्र मठाधिकारी, सायली मठाधिकारी यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. या चित्रपाटात अभिनेता आदिनाथ कोठारे, जान्हवी किल्लेकर, सुरेश विश्वकर्मा, पायल जाधव, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोवा, एकनाथ गीते, त्रिशा कमलाकर अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहे.

फार्महाऊसवर एका खूनाची घटना उघडकीस येते आणि त्यानंतर एक थरारक शोध सुरू होतो, या शोधात काय काय घडतं याची रंजक गोष्ट “मिरांडा वॉर्निंग” या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारे एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सस्पेन्स, थ्रिलर प्रकारातील चित्रपट यापूर्वी झाले आहेत. मात्र, आता “मिरांडा वॉर्निंग” या चित्रपटातून खून प्रकरणातील गुन्हेगार शोधाची थरारक गोष्ट पाहायला मिळणार आहे. उत्कृष्ट कथानक, कसलेले कलाकार असलेली तांत्रिकदृष्ट्या सक्षम कलाकृती पहायला मिळणार आहे.

एका खून प्रकरणातून उलगडत जाणारे नवनवे पदर, त्यातून निर्माण होणाऱ्या शंका-कुशंका आणि प्रश्न, प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठीचे तर्क यातून पोलिस अधिकारी खऱ्या गुुन्हेगारापर्यंत कसे पोहोचतात याची रंजक कहाणी “मिरांडा वॉर्निंग” चित्रपटातून पाहता येणार असल्याचं टीजरवरून दिसून येतं. त्यामुळे “मिरांडा वॉर्निंग” चित्रपटाविषयीची सर्व उत्तरं मिळवण्यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Teaser

YouTube player

 

IPRoyal Pawns