कर्ज प्रकरणात राजपाल यादवला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

कर्ज प्रकरणात राजपाल यादवला सर्वोच्च
न्यायालयाचा दणका; २४ तासांत ५ कोटी जमा
करण्याचे आदेश
‘अता पता लपता’ चित्रपटासाठी २०१० मध्ये
घेतलेल्या कर्जापोटी थकित झालेल्या ९ कोटी
रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेता राजपाल
यादवला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला
आहे. पूर्वीच्या आदेशानुसार ५ कोटी रुपये जमा न
केल्याने न्यायालयाने कडक भूमिका घेत त्याला २४
तासांची अंतिम मुदत दिली आहे. अन्यथा त्याला
३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल;
पुढील सुनावणी ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

IPRoyal Pawns