एका आईच्या वेदनेने घेतलं रणरागिणीचं रूप; मातृत्व, संताप आणि न्यायाच्या लढ्याची कथा सांगणारा ‘मर्दिनी’चा ट्रेलर प्रदर्शित

*एका आईच्या वेदनेने घेतलं रणरागिणीचं रूप; मातृत्व, संताप आणि न्यायाच्या लढ्याची कथा सांगणारा ‘मर्दिनी’चा ट्रेलर प्रदर्शित*

 

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या आशयप्रधान आणि भावनिकदृष्ट्या प्रभावी कथांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. समाजातील वास्तव, मानवी नातेसंबंध आणि संघर्ष यांना स्पर्श करणाऱ्या कथा प्रेक्षकांना अधिक जवळच्या वाटू लागल्या आहेत. अशाच एका हृदयस्पर्शी आणि तितक्याच थरारक कथानकाची उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘मर्दिनी’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

श्रेयस तळपदे प्रस्तुत, ‘मर्दिनी’ हा चित्रपट एका आईच्या भावविश्वातील सर्वात कोमल भावना आणि सर्वात भीषण संघर्ष यांचा प्रवास उलगडणारा सिनेमा आहे. लेकरांवर ओढवलेल्या संकटानंतर एका सामान्य आईच्या आयुष्यात घडणारी उलथापालथ आणि त्या संकटाविरुद्ध उभं राहताना तिच्यात जागृत होणारी असामान्य ताकद याची प्रभावी झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

मातृत्वाची वेगळी बाजू समोर आणतो. आपल्या लेकरांच्या रक्षणासाठी आई कोणत्याही मर्यादा ओलांडू शकते, कोणत्याही संकटाशी दोन हात करू शकते आणि गरज पडल्यास संपूर्ण व्यवस्थेलाही आव्हान देऊ शकते, हा संदेश ट्रेलरमधून प्रभावीपणे व्यक्त होतो. त्यामुळे हा चित्रपट केवळ एका आईची कथा न राहता प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा आणि जिद्दीचा गौरव करणारा ठरतो.

मातृत्वाच्या भावविश्वाला संघर्षाची धार आणि न्यायाच्या लढ्याला भावनांची खोली देणारा ‘मर्दिनी’ हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. एका आईच्या सामर्थ्याची, प्रेमाची आणि जिद्दीची कथा सांगणारा हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

IPRoyal Pawns