अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार एसटी चे ब्रँड अँबेसेडर.
एसटी प्रवाशांना सुविधा देण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख यांची एसटीचे ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती होणार आहे. पाच वर्षांच्या या कराराचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ देण्याची विनंती पत्राद्वारे केली असून लवकरच अधिकृत सोहळा पार पडणार आहे.
एकीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात मोठे बदल घडत आहेत. प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात, एसटीचा प्रवास सुलभ व्हावा तसेच एसटीचा तोटाही कमी होऊन चांगल्या सेवा दिल्या जाव्यात, यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. यासाठी वेगवेगळ्या
उपाययोजना राबवल्या जात आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया रितेश देशमुख यांची एसटीचे ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती
करण्याचा निर्णय घेतला आहे.































