महाश्वेतादेवींच्या कथांवरील नाटक ‘महोगाथा’
प्रख्यात लेखिका महाश्वेतादेवी यांच्या तीन कथांवर आधारित असलेले ‘महोगाथा’ हे मराठी नाटक आता रंगभूमीवर आले आहे. ‘काली बिल्ली प्रॉडक्शन्स’ या नाट्यसंस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. हे नाटक सावित्री मेधातुल यांनी लिहिले आहे आणि नाटकाची निर्मिती सुद्धा त्यांनी केली आहे. या नाटकाचे दिग्दर्शन मंगेश सातपुते यांनी केले आहे. नाटकाचे नेपथ्य व वेशभूषा सुमित पाटील यांची आहे. नाटकाला विक्रम होता यांनी संगीत दिले असून, प्रकाशयोजना विलास हुमणे यांनी केली आहे. हृदयनाथ जाधव, विक्रम होता, मुक्ती साधना आणि सावित्री मेधातुल हे कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत. ‘महोगाथा’चा शुभारंभाचा प्रयोग १३ मार्च रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये उत्साहात सादर करण्यात आला.
































