ऋषी मनोहर दिग्दर्शनात; “ठरलंय FOREVER”नं रंगभूमीवर धाडसी प्रयोग

*ऋषी मनोहर दिग्दर्शनात; “ठरलंय FOREVER”नं रंगभूमीवर धाडसी प्रयोग*

“दादा, एक गुड न्यूज आहे” या लोकप्रिय नाटकातील भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर करणारा ऋषी मनोहर आता दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. अलीकडे “कन्नी” (२०२४) चित्रपटातील भूषणच्या भूमिकेनं त्याला नवा आयाम दिला, तर नुकतंच त्यानं सतीश आळेकरांचं “महापूर” रंगभूमीवर यशस्वीपणे सादर केलं आहे.

गेल्या दशकभर रंगभूमीवर सतत नवे प्रयोग करणाऱ्या ऋषीसमोर आता स्वतःचं नाटक आणण्याचं मोठं आव्हान आहे. Wide Wings Media अंतर्गत “ठरलंय FOREVER” या नाटकात द्विभाषिक संवाद, लाईव्ह म्युझिक आणि तरुणाईची बोली अशा प्रयोगांचा संगम दिसणार आहे.

“मी पारंपरिक चौकटीत बसणारं नाटक करायचं नाही असं ठरवलं होतं. हे नाटक धाडसी आहे आणि थेट तरुणाईच्या भाषेत संवाद साधतं,” असं ऋषी मनोहर सांगतो. ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणारं हे नाटक रंगभूमीवर नवा ताजेपणा आणेल, अशी अपेक्षा आहे.

IPRoyal Pawns