‘ब्राह्मण सेवा मंडळा’च्या शतकमहोत्सवी गणेशोत्सव

*दादर भवानी शंकर रोड येथील ‘ब्राह्मण सेवा मंडळा’च्या शतकमहोत्सवी गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे आकर्षण*

*अभिनेत्री मुक्ता बर्वे, स्पृहा जोशी, संकर्षण कऱ्हाडे यांचे सादरीकरण तर जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, राणी वर्मा यांची विशेष उपस्थिती.*

*मुंबई, :* दादर भवानी शंकर रोड येथील ‘ब्राह्मण सेवा मंडळा’ची स्थापना दि. १० डिसेंबर १९१६ रोजी झाली. तथापि पहिला श्री गणेशोत्सव ११ ते २० सप्टेंबर १९२६ रोजी ‘मुकुंद मॅन्शन’ मध्ये संपन्न झाला. स्थापनेपासूनच मंडळामध्ये अनेक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये  राम मराठे, जयमाला शिलेदार, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. प्रभा अत्रे, प्रा. वसंत बापट, वि. दा. करंदीकर, मंगेश पाडगावकर, सच्चिदानंद शेवडे, रामदास कामत, आशा खाडिलकर, चारुदत्त आफळे, दिलीप प्रभावळकर, प्रशांत दामले, राहुल देशपांडे, कौशल इनामदार इत्यादी अनेक दिग्गज कलाकारांनी, व्याख्यात्यांनी आणि मान्यवरांनी आपल्या कलेचे सादरीकरण येथे केले आहे. मंडळाची ही परंपरा आजही कायम असून यावर्षी मंडळाने शतकमहोत्सवी गणेशोत्सवाचे औचित्य साधत सामाजिक विषय आणि मनोरंजनाचा मेळ साधून दररोज विविध कार्यक्रम मंडळाने आयोजित केले आहेत.

दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वा.

‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ हा पु.ल. देशपांडे आणि सुनीताबाई यांच्याशी जोडलेले कविता – प्रेमातून उलगडणारे संवाद आणि शोध टिपण असा अत्यंत वेगळा काव्यमय नाट्यप्रयोग अभिनेत्री  मुक्ता बर्वे अत्यंत मुलायम आणि प्रभावी अभिनयाद्वारे सादर करणार आहेत. कथा-काव्य, रेखाचित्रे, संगीत, गायन आणि समृद्ध वातावरण रसिकांना एक विलक्षण अनुभव देणार आहे. मुक्ता बर्वे यांच्यासोबत या कार्यक्रमात अमित वझे, मानसी वझे, निनाद सोलापूरकर, जयदीप वैद्य, अंजली मराठे यांची सोबत असणार आहे.

दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वा. ‘

ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’. वक्ते : मा. ले. ज. विनायक पाटणकर (नि.) व मा. ले. ज. एस. एस. हसबनीस (नि.), मुलाखतकार : जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर.

दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वा.

‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’- वक्ते : प्रद्योत पेंढारकर, मुलाखतकार : सर्वेश देशपांडे.

१ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा.

हा विशेष कार्यक्रम सादर होईल. दुसरा अत्यंत वेगळा कार्यक्रम सादर करण्यासाठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी या लोकप्रिय जोडीचा ‘संकर्षण via स्पृहा’ हा मराठी साहित्य – मनोरंजनाचा कार्यक्रम सादर होईल. कवितांपासून गाणी, किस्से, आठवणी आणि खास गप्पांची मैफिल ते सादर करतील. त्यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून विनय चौलकऱे आणि गांधीर जोग यांची साथ असणार आहे.

दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा.

पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी निमित्ताने माणिक वर्मा यांच्या सुमधुर गीतांवर आधारित ‘हसले मनी चांदणे’ हा कार्यक्रम सादर होईल. माणिक वर्मा यांच्या कन्या वंदना गुप्ते, राणी वर्मा आणि इतर सदस्य उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सादर होणार आहे.

दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वा.

वारकरी कीर्तन – ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील.

अश्या अत्यंत वेगळ्या सामाजिक – मनोरंजनकात्मक कार्यक्रमांचा आस्वाद गणेशभक्त रसिकांना ‘ब्राह्मण सेवा मंडळा’च्या सांस्कृतिक मंचाने उपलब्ध करून दिले आहे. रसिकांना हे सर्व कार्यक्रम विनामूल्य पहाता येणार असून काही रांगा आरक्षित असणार आहेत. हे सर्व कार्यक्रम ‘ब्राह्मण सेवा मंडळ’, भवानी शंकर रोड, दादर (प), मुंबई २००२८ येथे सादर होतील.

IPRoyal Pawns