कलावंत स्वत: एकटा मोठा होत नसतो तो विविध ठिकाणाहून चांगले गुण घेऊन संपन्न होत असतो -अजित भुरे

नाट्यगृहांचा प्रश्न हल्ली सातत्याने मांडला जातो. नाट्यगृह बांधतानाच काही गोष्टींचा विचार परिषद आणि शासनकर्त्यांनी करायला हवा.असं सांगताना अजित भुरे यांनी  उपस्थित  मान्यवरांचे आभार मानत  त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केलं . यावेळी  बोलताना  ते म्हणाले की  उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत. नाट्यव्यवसायाला उद्योगाचं रूप कसं देता येईल ह्यासाठी ते सतत कार्यरत असतात. सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार ह्यांच्या रुपाने आम्हाला एक नाट्यप्रिय रसिक लाभला आहे जो संपूर्ण कलाक्षेत्रातील कलाकारांना उत्तेजन देत असतो. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांनी अर्थमंत्री ह्या भूमिकेत जास्तीत जास्त निधी ह्या संमेलनाासाठी उपलब्ध करून दिला आहे. आजचे उद्घाटक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच मराठी नाटक प्रगतीपथावर राहावं ह्यासाठी मदत करायला उत्सुक असतात.

कलावंत स्वत: एकटा मोठा होत नसतो तो विविध ठिकाणाहून चांगले गुण घेऊन संपन्न होत असतो. जब्बार पटेल हे मराठी रंगभूमीवरचे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांच्या हातून चांगले कार्य घडेल. शंभराव्या संमेलनाच्या निमित्ताने पाच महिने रंगकर्मी कार्यरत राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त  करत  माजी संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी  यांनी  पुढच्या काळात मराठी रंगभूमी भारतीय रंगभूमीचे नेतृत्व करेल, असा विश्वास व्यक्त केला.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns