दुसऱ्या दिवशीही पावसाचा हाहाकार….

दुसऱ्या दिवशीही पावसाचा हाहाकार….

 

मुसळधार पावसामुळे वीरा देसाई मार्ग पाण्याखाली

दादर मध्ये ठीक ठिकाणी भागात पाणी साठले

 मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळी असल्याने प्रवाशांचे हाल झाले असून ठाण्यातील रेल्वे प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावर उतरून चालत स्टेशन कडे निघाले आहेत.

 मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला असून  आता या परीक्षा 23 ऑगस्टला होणार.

 ठाण्याहून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी वाहतूक मंदावली.

 ठाण्याच्या वंदना डेपो परिसरात साचले पाणी

 वडाळ्यातील चार रस्ता परिसरात रस्त्यावर साचले पाणी

 मुंबई मिठी नदीने धोकादायक पातळी गाठली

 डोंगराळ भाग असल्याने सूर्य नगर भांडुप येथील रहिवाशांचे स्थलांतर

 अंधेरी येथील वीरा देसाई रोड पाण्याखाली

 ठाणे तलाव पाळी परिसरात रस्त्यावर पाणी साचले

 पश्चिम द्रुतगदी मार्गावर वाहतूक कोंडी

 गायमुख घाट परिसरात बस बंद पडली

 माजीवडा  परिसरात वाहतूक कोंडी

 वसई विरार सकल भागात साचले पाणी

 इंद्रलोक परिसरात रस्त्यावर पडले मोठे झाड

 मुंबई ठाणे पालघर ला 24 तासांसाठी रेड अलर्ट

 आज मंत्रिमंडळ बैठक मदतीची घोषणा होणार

 मुंबईतील शासकीय निमशासकीय कार्यालय बंद

 कुर्ल्यातील रस्ता मुसळधार पावसामुळे पाण्याखाली

 एलबीएस परिसरातील दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद

 मुंबईहून पनवेल ला जाणारी रेल्वे वाहतूक काही काळासाठी बंद 11.03am

 वसई मिठागर भागात कमरेभर पाणी

 गोरेगाव ओबेराय मॉल समोरील रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी

 मुंबई चुनाभट्टी परिसरात साचले पाणी

 कांजूरमार्ग परिसराला नदीचे स्वरूप

 जे व्ही एल आर भागात साचले पाणी

 ठाणे ते सीएसएमटी ट्रेन बंद

 हार्बर मार्ग बंद झाला

 गेल्या दोन तासापासून बंद पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल चा

 इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाल्याने श्वास घ्यायला त्रास होत असल्याची प्रवासांची तक्रार

 प्रवाशांची सुटका होण्याची मोहीम सुरू, लवकरच सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडतील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले  8.00pm

 हा प्रकार का घडला याची चौकशी करण्यात येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

IPRoyal Pawns