प्रति पंढरपुरात ‘माई मीडिया २४’ चे लाडू व चिक्की वाटप
आषाढी एकादशीला एक वेगळेच महत्त्व आहे. वारकऱ्याला या दिवशी पांडुरंग भेटीची ओढ लागते भेटी लागे जीवा म्हणत वारकरी पंढरपुरात ऊन वारा पावसाची तमा न बाळगता विठुरायाचे एक दर्शन घेण्यासाठी संपूर्ण वर्षभर वाट बघत असतो.
मुंबईत दादर येथील वडाळा येथे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलाच्या मंदिरात सुद्धा पांडुरंगाच्या एका भेटीसाठी लोक पहाटेपासून रांग लावून उभे असतात.
माई मीडिया 24 तर्फे आज ( रविवारी ) पांडुरंगाच्या भक्तांना लाडू व चिक्कीचे वाटप करण्यात आले. माई मीडियाच्या अध्यक्ष शीतल करदेकर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष व जेष्ठ पत्रकार सचिन चिटणीस, मुंबई जिल्हा समन्वयक गणेश तळेकर, विजय कांबळे यांनी वाटप केले.
































