तिसरे विश्व मराठी संमेलन पुणे येथे ३१ फेब्रुवारीला, संमेलनात विविध कार्यक्रमांची रेलचेल.
*येत्या ३१ फेब्रुवारी रोजी पुणे येथे होणाऱ्या तिसऱ्या विश्व मराठी संमेलनात उघडणार ज्ञानाचा खजिना*
*विविध कार्यक्रमांची रेलचेल*
*नाटक, सिनेमा, साहित्य, परिसंवाद, कवी संमेलन, चर्चासत्र रंगणार*
तिसरे विश्व मराठी संमेलन, पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अंगणात भरणार असून यात खास ‘पु. ल. देशपांडे नगरी’ वसवण्यात आली आहे. ३१ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी या तीन दिवस संपन्न होणाऱ्या या संमेलनात अनेक रंगारंग कार्यक्रम सामील असून ते ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ मुख्य मंचावरती होणार आहेत.
तसेच फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्र. के. अत्रे सभागृहात व बालगंधर्व रंगमंदिर येथे काही कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता या संमेलनाची सुरुवात नाशिक ढोल च्या गजरात मराठमोळे फेटे बांधून ज्येष्ठ मराठी साहित्यिक, परदेशी मराठी भाषिक, कलावंत, महिला युवा लेखक हे निघणाऱ्या शोभायात्रे मध्ये सहभाग होणार आहेत.
सकाळी ११ वाजता या संमेलनाचा उद्घाटन समारंभ होणार असून यावेळेस जेष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा साहित्य भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. तसेच अभिजात मराठी समिती मान्यवरांचाही सत्कार होणार आहे व यावेळेस ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ सादर करते संगीतकार कौशल इनामदार हा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे.
दुपारी ‘अभिजात मराठी अभिमान मराठी’ या परिसंवादात पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, सदानंद मोरे, ज्ञानेश्वर मुळे, लक्ष्मीकांत देशमुख, रवींद्र शोभणे हे सहभागी होणार आहेत.
त्यानंतर ‘मराठी भाषा आणि प्रसार माध्यमे’ या कार्यक्रमात पराग करंदीकर (महाराष्ट्र टाइम्स), सम्राट फडणीस (सकाळ), सरिता कौशिक (एबीपी माझा), विलास बडे (न्यूज १८), प्रसन्न जोशी (पुढारी न्युज) निलेश खरे (साम टीव्ही) हे जेष्ठ पत्रकार सामील होणार आहेत.
त्यानंतर होणाऱ्या ‘नव्या जुन्यांचे कवी संमेलन’ या संमेलनात रामदास फुटाणे, अशोक नायगांवकर, विठ्ठल वाघ, अरुण म्हात्रे, महेश केळुसकर, किशोर कदम, आबा पाटील- कर्नाटक, हर्षदा सुखटणकर -कर्नाटक, मेघना वर्तक – दुबई, नारायण पुरी -संभाजीनगर, अपूर्व राजपूत, वैभव जोशी व संकर्षण कऱ्हाडे सामील होणार आहेत.
त्यानंतर ‘मराठीचा झेंडा अटकेपार’ हा कार्यक्रम होईल.
त्यानंतर रत्नकांत जगताप सादर करतील ‘महाराष्ट्राची महासंस्कृती’
शनिवार दिनांक १ फेब्रुवारी….
सकाळी महाराष्ट्र माझा या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील लोककला आणि पारंपारिक वाद्यांवर आधारित कार्यक्रम असेल व तो सादर करतील गणेश चंदनशिवे आणि सहकारी.
त्यानंतर वाद्यांची जुगलबंदी सादर करतील निलेश परब व कृष्णा मुसळे.
त्यानंतर ‘प्रशासनातील मराठी भाषा’ यावर चर्चासत्र होईल यात विकास खारगे, अशोक काकडे, राजीव नंदकर, वैशाली पतंगे भाग घेतील.
त्यानंतर ‘समाज माध्यमांवरील प्रभावी ( इन्फ्लुएंसर ) व्यक्तिमत्वे’ या परिसंवादात भाग घेतील अथर्व सुदामे, रचना रानडे, पवन वाघूळकर व शार्दुल कदम.
त्यानंतर होणाऱ्या ‘विज्ञान तंत्रज्ञानातील मराठीचा वापर’ या परिसंवादात भाग घेतील पद्मविभूषण अनिल काकोडकर, पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर, कुलगुरू सुरेश गोसावी, विवेक सावंत.
त्यानंतर राजू तुलालवार सादर करतील ‘बाल साहित्याचा अविष्कार’
त्यानंतर होणाऱ्या ‘नाटक चित्रपटातील मराठी भाषा’ या परिसंवादात भाग घेतील महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, डॉक्टर विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, अमेय खोपकर, केदार शिंदे, प्रवीण तरडे, कांचन अधिकारी सोबत असतील अजित भुरे.
त्यानंतर ‘अभिजात भावसंगीत, अभंग नाट्यसंगीताची सुरेल मैफिल ‘स्वरसंध्या’ सादर करतील महेश काळे.
रविवार दिनांक २ फेब्रुवारी……
सकाळी ‘अभंगवाणी’ सादर करतील ज्ञानेश्वर मेश्राम, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, रोहित सरनोबत व जयेश घाडी.
त्यानंतर ‘मराठी उद्योजकांचे चर्चासत्रात’ भाग घेतील उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अतुल किर्लोस्कर, विजय शिर्के, आनंद गानू ( गर्जे महाराष्ट्र ), हनुमंतराव गायकवाड ( बीव्हीजी ग्रुप ), विलास शिंदे ( सह्याद्री फार्म्स नाशिक ).
त्यानंतर होणाऱ्या ‘मराठी भाषा आणि स्त्री साहित्य’ या परिसंवादात भाग घेतील विधान परिषद, महाराष्ट्र राज्याच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे, मनीषा पाटण – म्हैसकर, अश्विनी भिडे, प्रतिभा मतकरी, फैयाज शेख, डॉक्टर सिसिलिया कार्व्हालो. निवेदन करतील उत्तरा मोने.
त्यानंतर होणाऱ्या ‘मराठी भाषा आणि ग्रामीण साहित्य’ या परिसंवादात भाग घेतील इंद्रजीत भालेराव, कृष्णात खोत, प्रतिमा इंगोले, डॉक्टर संजीव गिरासे.
त्यानंतर होणाऱ्या ‘मराठीचे ग्रंथ वैभव’ या परिसंवादात भाग घेतील कुलगुरू डॉक्टर अविनाश अवलगावकर, राजा दीक्षित, दिलीप धोंडगे, मनीषाताई बाठे, डॉ. रमेश वरखेडे, श्रीपाद भालचंद्र जोशी.
त्यानंतर होणाऱ्या ‘मराठी भाषा आणि युवक’ या परिसंवादात भाग घेतील प्रणव सखदेव, नितीन थोरात, देवा झिंजाड, शरद तांदळे व वैभव देशमुख.
सायंकाळी सहा वाजता विश्व मराठी संमेलनाचा सांगता समारंभ पद्मपुरस्कारार्थी मराठी व्यक्तींचा सन्मान करून होणार आहे या समारंभास केंद्रीय राज्यमंत्री सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे उपस्थित असतील.
यावेळेस ‘कलारत्न’ हा विशेष सन्मान रितेश देशमुख यांना देण्यात येणार आहे.
तर ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचा सुद्धा सत्कार होणार आहे.
सायंकाळी ७ वाजता आजच्या मराठी संगीताचा बहारदार नजराणा ‘स्वरझंकार’ सादर करतील अवधूत गुप्ते, वैशाली सामंत व स्वप्निल बांदोडकर.
प्र. के. अत्रे सभागृहात शुक्रवारी……
‘मराठी बोलींच्या सर्वेक्षणाबाबत सादरीकरण’ सोनाली कुलकर्णी, डेक्कन कॉलेज पुणे या सादर करतील तर ‘अनुवाद विषयक चर्चासत्र व परिसंवाद’ रवींद्र गुर्जर, उमा कुलकर्णी, लीना सोहनी सादर करतील.
प्र. के. अत्रे सभागृहात शनिवारी……
चारूहास पंडित सादर करतील व्यंगचित्रांची दुनिया ( चिंटू ) ही कार्यशाळा. शालेय विद्यार्थ्यांसाठीचा विशेष कार्यक्रम.
त्यानंतर ‘वंदे मातरम : स्वातंत्र्य प्रेरणेची १५० वर्ष. सादर करतील मिलिंद सबनीस, सुधीर जोगळेकर, अरुण करमरकर.
त्यानंतर दुपारी ‘महिला कायदा व महिलांना न्याय मराठी भाषेत’ या परिसंवादात भाग घेतील महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे, मृणाल भाटकर, उज्वल निकम, साधना जाधव.
त्यानंतर ‘मराठी भाषेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ ( आर्टिफिशियल इंटेलिजन्स – AI ) या परिसंवादात भाग घेतील अच्युत गोडबोले, सुधीर कुलकर्णी, भूषण केळकर, अभिषेक सूर्यवंशी व श्रीधर लोणी.
यानंतर होणाऱ्या ‘माध्यमांची लेखणी’ या कार्यशाळेत ( उपशीर्षक फेसबुक, इन्स्टा, एक्स इत्यादी समाजमाध्यमात प्रभावी लेखन कसे करावे ? ) हे सांगतील आशुतोष जावडेकर.
त्यानंतर सायंकाळी होणाऱ्या ‘ज्ञानपीठाचे ज्ञानतपस्वी’ सादर करतील सुनील महाजन.
प्र. के. अत्रे सभागृहात रविवारी……
सकाळी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे सादरीकरण होईल.
त्यानंतर दुपारी ‘अभ्यासक्रमातील मराठी भाषा वाटचाल’ या परिसंवादात भाग घेतील श्रीकृष्ण काकडे अकोला, पृथ्वीराज तौर नांदेड, राजशेखर शिंदे सोलापूर, दासु वैद्य संभाजीनगर .
त्यानंतर होणाऱ्या ‘मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी’ या परिसंवादात भाग घेतील संदीप नूलकर -भाषांतर, भानू काळे- संपादन, वसुंधरा काशीकर- निवेदन, विजय सरदेशपांडे- मुद्रितशोधक.
बालगंधर्व रंगमंदिरात होणारे कार्यक्रम….
‘सागरा प्राण तळमळला’ संदर्भ महेश मांजरेकर ‘चाणक्य’ संदर्भ प्रणव जोशी.