सचिन चिटणीस.
या चित्रपटास मिळत आहेत 3 स्टार
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील जंगलात नरभक्षक झालेला वाघ जंगलातून गायब होतो. या नरभक्षक वाघाला मारण्यासाठी अखेर वनाखाते न्यायालयाकडून परवानगी घेते. त्यानंतर मग त्या वाघाचा कशाप्रकारे थरारक शोध वनखात व सीबीआए घेते, यावर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. या चित्रपटाच्या सुरुवात घनदाट जंगल प्राणी पक्षी यांच्या मोहक रूपाने होते आणि वाघाचा मानवावर हल्ला अशी पाहायला मिळते. त्यानंतर मग कशाप्रकारे पोलीस त्या नरभक्षक वाघाचा शोध घेतात, हे यात दाखवण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये जंगलाचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे. विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण सुरु झालं आहे. परिणामी, जंगल असलेल्या ठिकाणी बांधकाम करुन मोठ्या कंपन्या, इमारती बांधण्यात आल्या आहेत. याचाच परिणाम वन्यजीवांवरही होत आहे. हे दाखवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न बऱ्याच प्रमाणात साध्य झाल्याचे आपणास हे चित्रपट बघतांना जाणवते.
कृष्णा सोरेन यांनी चित्रपटाचं छायांकन केले असून, मयूर हरदास यांनी संकलन तर महावीर सब्बनवार यांनी ध्वनि आरेखन, यश पगारे यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. जंगल, वन्यजीव अशा विषयांवर काही मोजके अपवाद वगळता फार चित्रपट झालेले नाहीत. त्यामुळे ‘टेरिटरी’ हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा आहे.
दिग्दर्शक सचिन श्रीराम यांनी फिलिपिन्समधील इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनमधून चित्रपटाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असून अकादमी ऑफ थिएटर आर्ट्स मध्ये ही मास्टर्स इन थिएटर आर्ट्स केले आहे. बऱ्याच चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
चित्रपटाला एक लय आहे, तो स्मूथली पुढे जातो पण थोडा अधिक वेग घेतला असता तर चित्रपट प्रेक्षकांना अधिक आवडला असता असे वाटते.
किशोर कदम यांनी वन अधिकाऱ्याची भूमिका उत्कृष्ट निभावली आहे. संदीप कुलकर्णी व इतरांची त्यास चांगली साथ मिळाली आहे.
*चित्रपट – टेरिटरी*
सेन्सॉर – U
कालावधी – १११ मिनिटे ( १ तास ५१ मिनिटे)
निर्मिती संस्था – डिवाईन टच प्रॉडक्शन
निर्माते – श्रीराम मुल्लेमवार
कथा, संवाद, दिग्दर्शन – सचिन श्रीराम
छायाचित्रण – कृष्णा सोरेन
संकलन – मयूर हरदास
पार्श्वसंगीत – यश पगारे
*कलाकार*
संदीप कुलकर्णी – डी वाय एसपी देशमुख
किशोर कदम – दरोगा जिड्डेवर
सुनयना खोब्रागडे – चंदा
भारत रंगारी – बापूराव
दिनेश इंगोले – गार्ड मेश्राम
रविकिरण कांडलकर – पारधी
विराग जाखड – गावकरी
सुदेष्णा नावकार – गावकरी