स्वराज्याची शान आणि भगव्याचा मान अबाधित राखणारा ‘शिवप्रताप गरुडझेप…..’
सचिन चिटणीस ( या चित्रपटाला मिळत आहेत साडेतीन स्टार )
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण कोणता असेल तर तो म्हणजे आग्र्याहून सुटका हा होय इतक्या कडेकोट बंदोबस्तातुन पूर्ण तयारीनिशी बारीकसारीक गोष्टीचा चहूबाजूने विचार करत औरंगजेबा सारख्या महाकपटी धूर्त अश्या क्रूरकर्माच्या तावडीतून सुटणे यातच छत्रपती शिवाजी महाराजांचे बुद्धीकौशल्य दिसून येते आणि फक्त आग्र्याहून सुटका या विषयावर डॉक्टर अमोल कोल्हेनी निर्मित केलेला हा पहिलाच चित्रपट होय.
हिंदवी स्वराज्याचा छत्रपती शिवाजीमहाराज करत असलेला विस्तार, शाहिस्तेखानची महाराजांनी छाटलेली बोटे, सुरत शहर लूट या सर्व घडामोडीं मुळे औरंगजेब अगोदरच बिथरलेला होता त्यात महाराजांनी त्याच्या वाढदिवसाच्या वेळी कुर्निसात न केल्यामुळे औरंगजेबाचा भर दरबारात झालेला अपमान यामुळे महाराजांना नजरकैदेत ठेवण्याचा औरंगजेब हुकूम देतो.
औरंगजेबाच्या तावडीतून महाराज आपल्या बुध्दीकौशल्यावर सहिसलमत निसटून स्वराज्यात परततात ही सर्व घटना विस्तृतपणे आपल्याला शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटात पहावयास मिळते.
ग्रंथांचा संदर्भ घेत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी वास्तवाला धरून काही गोष्टी मांडल्या असून त्या आपल्या मनाला पटतात आणि त्यामुळेच आपण आपल्या लहानपणी पुस्तकातून शिकलेल्या गोष्टींपेक्षा या चित्रपटात काही महत्त्वाच्या गोष्टी या वास्तवदर्शी घटनांचा विचार करून मांडल्याचे आपल्याला दिसते.
‘स्वराज्याची शान आणि भगव्याचा मान अबाधित राहील असंच वर्तन ठेवा’…..
मनगटातली ताकद आणि उरातली हिंमत पुरेशी आहे गनिमाला गाडण्यासाठी…..
औरंगजेब आमच्या हालचालींवर मर्यादा घालू शकतो, बुद्धीच्या भरारीवर नाही….
या आग्रा भेटीत स्वराज्याच्या भावी राजाला दिल्लीच्या तख्ताची आणि त्या दिल्लीच्या तख्ताला मराठी रक्ताची ओळख पटेल…..
……अश्या जबरदस्त स्फुर्तीदायक संवादाने चित्रपट अधिकच रुबाबदार झाला आहे.
काही छोट्या छोट्या गोष्टींकडे ( व्हिएफएक्स, हाथ कापल्यावर वाहणारे रक्ताचे पाट वगौरे ) थोडे अधिक लक्ष दिले असते तर….
चित्रपटातील संगीत व गाणी उत्तम खास करून शेर आ गया, जय भवानी जय शिवराय, बम बम भोले
डॉक्टर अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजीमहाराज उत्तम रंगवले आहेत, छोट्या शंभू राजांची भूमिका हरक अमोल भारतीया याने जोशात रंगवली आहे. बाकी सर्व कलाकारांनी आपआपली भूमिका चोख बजावली आहे.
‘शिवप्रताप गरुडझेप’
निर्मिती – जगदंब क्रिएशन्स
निर्माता – डॉ. अमोल रामसिंग कोल्हे, विलास मनोहर सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर,कार्तिक राजाराम केंढे
सहनिर्माता – प्रफुल्ल तावरे
दिग्दर्शक – कार्तिक राजाराम केंढे
छायाचित्रण – संजय जाधव
कला दिग्दर्शक – महेश गुरुनाथ कुडाळकर
कार्यकारी निर्माता – रवी मानकामे
पटकथा – डॉ. अमोल रामसिंग कोल्हे
संवाद – डॉ. अमोल रामसिंग कोल्हे, युवराज पाटील
संकलन – पीटर गुंड्रा
संगीतकार – शशांक पोवार, रोहित नागभिडे
पार्श्व संगीत – शशांक पोवार
गीतकार – हृषिकेश परांजपे
साहस दृश्ये – रवी दिवाण
वेशभूषा – मानसी अत्तरदे
नृत्य दिग्दर्शन – दिपाली विचारे
रंगभूषा – राहुल सुरते
केशभूषा – जयश्री नाईक
व्हीएफएक्स – पोस्टहब स्टुडिओज
क्रिएटिव्ह कन्सल्टंट – प्रशांत खेडेकर
क्रिएटिव्ह सुपरवायझर – कीर्ती डेघटक
निर्मिती व्यवस्थापन – क्रिएटिंग पिक्चर्स
पोस्टप्रोड्क्शन हेड – केदार जोशी
कलाकार
छत्रपती शिवाजी महाराज : डॉ.अमोल रामसिंग कोल्हे
औरंगजेब : यतीन कार्येकर
जिजामाता : प्रतीक्षा लोणकर
शंभूराजे : हरक अमोल भारतीया
मिर्झा राजे : शैलेश दातार
रामसिंग : हरीश दुधाडे
सोयरा बाई : मनवा नाईक
पुतळा बाई : पल्लवी वैद्य
बहिर्जी नाईक : अजय तपकिरे
येसाजी कंक – महेश फाळके
हिरोजी फर्जंद : रमेश रोकडे
जहाँआरा : अलका बडोला कौशल
जाफर खान : आदी ईराणी
फौलाद खान : विश्वजीत फडते