‘….आता गृहीत धरलय मी तुझं असणं’ सहेला रे
सचिन चिटणीस ( ४ स्टार )
‘सहेला रे’ हा मृणाल कुलकर्णी यांनी सादर केलेला एक उत्तम चित्रपट असून, लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन या सर्व गोष्टींसाठी त्या कौतुकास पात्र ठरल्या आहेत.
कॉलेजचे पुनर्मिलन निरंजनला क्षमाच्या आयुष्यात परत आणते आणि तिला तिचे आयुष्य नव्याने जगण्याचा आत्मविश्वास देते.
‘सहेला रे’ ची सुरुवात सलील कुलकर्णीच्या ‘सई बाई गं’ या सुंदर रागाने होते. सुंदर सिनेमॅटोग्राफी असलेल्या या गाण्यातून प्रेक्षकांना क्षमाच्या रजई व्यवसायाची भेट घडवते. कॉलेज रीयुनियन साठी जमलेले प्रत्येकजण क्षमाच्या आणि तिचा नवरा ‘विक्रम’ यांच्याबद्दल बोलत असतात.
निरंजन काणे अमेरिकेत गेली २२ वर्ष व्यवसाय करणारा व पुण्यामध्ये व्यवसायाच्या कामासाठी आलेला क्षमाच्या शाळकरी मित्र जो तिच्या बरोबर तिच्या कॉलेजमध्ये सुद्धा असतो व क्षमा वर जीवापाड प्रेम करत असतो पण त्या वेळच्या परिस्थिती मुळे तो आपले प्रेम क्षमा समोर उघड करू शकत नाही. तो क्षमाच्या नवऱ्याचा म्हणजेच विक्रमचा प्रयोगशील व्यवसाय बघावयास येतो त्या दिवशी क्षमाचा वाढदिवस असतो पण विक्रम विसरतो मात्र निरंजन लक्षात ठेवून क्षमाला गिफ्ट आणतो त्यावेळेस क्षमाच्या मनात द्वंद्व उभे राहते नक्की आपला नवरा आपल्यावर प्रेम करतो का? कारण विक्रम व्यवसायात प्रचंड बिझी असतो म्हणून तो क्षमासाठी वेळ देऊ शकत नसतो.
क्षमाच्या मनात रजईचा कारखाना काढावा हे कित्येक वर्षापासूनचे स्वप्न असते मात्र काही ना काही कारणास्तव ते पुढे ढकलले जात असते.
निरंजन तिचा वाढदिवस लक्षात ठेवुन अमेरिकेहून आलेला असतो. विक्रमची फॅक्टरी बघायला जाताना निरंजन मध्येच क्षमाला सांगतो आपण ट्रेकिंगला जाऊया का व ते दोघेही ट्रेकिंगला जातात तिथे तो क्षमा समोर आपले प्रेम उघड करतो क्षमा बावचळुन जाते कारण त्यावेळेस कॉलेजमध्ये क्षमाचे सुद्धा निरंजन वर प्रेम असते मात्र निरंजन तिला याबद्दल काहीच बोलत नसल्याने ती विक्रमचे स्थळ आल्यावर लग्न करते. ट्रेकिंगला आल्यावर काही क्षणासाठी क्षमाच्या मनाची उलथापालथ होते त्यानंतर दोघांमध्ये एक सुंदर परिपक्व प्रेमकथा सुरू होते.
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बोलताना आणि मध्यमवयीन संकटाच्या काही भागांना स्पर्श करूनही हा चित्रपट हळुवार पण भावनिक आनंद देतो.
सुबोध भावे चा रोल मोठा नसला तरी सुबोध उत्तम अभिनय करून जातो. सुहिता थत्ते छान, मृणाल कुलकर्णी आणि सुमित राघवन यांची केमिस्ट्री तुम्हाला थक्क करते. आणि त्याला मिळालेली पार्श्वसंगीताची जोड कमाल. अलीकडच्या काळातील मराठी चित्रपटां मध्ये हा चित्रपट उजवा ठरतो.
काही लोक आपल्या जीवनात प्रवेश करतात जेव्हा आपण आपल्या भावनिक स्थितीत असतो तेव्हा ते आपल्याला नवीन जीवन जगण्याची इच्छा देऊन एक सुंदर छाप सोडतात. ही नाती नेहमीच अनामिक राहतात पण ती आपल्याला कायमची बदलतात!! ‘सहेला रे’ हा आपल्याला भेटणाऱ्या अशाच सुंदर माणसांचा गजर आहे.
‘सहेला रे’ जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून नात्याच्या विविध छटा शोधतो. ही कथा एका मित्राच्या किंवा ‘सहेला’च्या प्रेम आणि सहवासातून स्त्रीच्या ओळखीचा पुनर्शोध घडवते ज्याचा बिनशर्त पाठिंबा तिला तिचा खरा स्वभाव शोधण्यात मदत करतो.